शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भिंवडीतील मनसे कार्यकर्त्यांनी टोलनाका फोडला, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 14:39 IST

1 / 7
भिवंडी-ठाणे रस्त्याची सध्या प्रचंड दुरावस्था झाली असून या रस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या दुरुस्तीसंदर्भात मनसेने अनेक आंदोलने करत रस्ता दुरुस्त करण्याची विनंती कशेळी टोल नाक्यावर टोल वसूल करणाऱ्या कल्याण संगम इन्फ्रा या टोल कंपनीसह सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली होती.
2 / 7
गणेशोत्सव काळात रस्ता बनला नाही तर मनसेच्यावतीने टोल नाका फोडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता. अखेर टोल कंपनीसह सार्वजनिक बांधकाम विभागाने मनसेच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले.
3 / 7
त्यामुळे, सोमवारी सकाळी मनसेचे जिल्हा सचिव संजय पाटील व मनसे वाहतूक सेनेचे तालुकाध्यक्ष संतोष म्हात्रे यांनी कशेळी येथील टोलनाका फोडला व टोल कंपनीसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभाराचा जाहीर निषेध केला.
4 / 7
ठाणे भिवंडी रस्त्यावर पडलेल्या खड्यांमुळे या महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी होत असते ज्याचा त्रास सामान्य नागरिकांसह वाहन चालक व प्रवाशांना होत आहे.
5 / 7
रस्ता नादुरुस्त असतांनाही या महामार्गावर कशेळी येथील टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात टोल वसुली होत असते. रस्ता कोमात आणि टोल वसुली जोमात अशी परिस्थिती या रस्त्याची असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने या रस्त्याच्या दुरवस्थेसंदर्भात अनेक आंदोलने करण्यात आली होते.
6 / 7
टोल वसूल करणाऱ्या कल्याण संगम इन्फ्रा या कंपनीबरोबरच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर या आंदोलनांचा कोणताही परिणाम झालेला नाही.
7 / 7
टोल कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षित कारभारामुळे या रस्त्याची पुरता दुरावस्था झाली असून गरोदर महिलांसह वृद्धांना खड्डेमय रस्त्यातून प्रवास करतांना मोठ्या अडचणींचा सामना करावा.
टॅग्स :MNSमनसेtollplazaटोलनाकाbhiwandiभिवंडी