1 / 10जगभरातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येनं सगळ्यांना चिंतेत टाकले आहे. जगभरातील कोरोना रुग्णांचा आकडा 49 लाख 10,710 इतका झाला आहे. त्यापैकी 19 लाख 19,151 रुग्ण बरे झाले आहेत, परंतु 3 लाख 20,448 जणांना आपले प्राण गमवावे लागले. 2 / 10अमेरिकेत सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. येथील संख्या 15 लाखांच्या वर गेली असून 91 हजारांहून अधिकांचा मृत्यू झाला आहे, तर साडेतीन लाख रुग्ण बरे झाले आहेत.3 / 10या संकट काळात अमेरिकेतील गरजूंना जीवनावश्यक वस्तू पुरवण्यासाठी टेनिसपटू युजेन बुचार्डनं एक अट ठेवली होती. तिनं सोशल मीडियावर एक ऑक्शन पॅकेज टाकला होता.4 / 10या पॅकेजमध्ये तिनं तिच्यासोबत एक ग्रँड स्लॅम सामना पाहण्यापासून ते डेटवर जाण्याचा पर्याय ठेवला होता. या ऑक्शनसाठी 37 जणांनी बोली लावली आणि त्यातून उभा राहिलेला निधी पाहून बुचार्डलाच आश्चर्याचा धक्का बसला.5 / 10ऑल चॅलेंज वेबसाईटच्या वृत्तानुसार सर्वाधिक बोली लावणारी व्यक्ती कॅनडाच्या या टेनिस सुंदरीसह अमेरिकन ओपन ते विम्बल्डन मधील कोणताही एक सामना पाहणार आहे आणि तेही एका मित्रासोबत. दोन लाख रुपयांपासून या बोलीला सुरुवात होणार होती.6 / 10एका चाहत्यानं बुचार्डसोबत डेटवर जाण्यासाठी तब्बल 70 हजार पाऊंड म्हणजे सात कोटींची बोली लावली. हे पैसे ती अमेरिकेच्या फाईव्ह सेकंड फ्रेमला दान करणार आहे.7 / 1026 वर्षीय बुचार्ड जागतिक क्रमवारीत 332 क्रमांकावर आहे. पण, तिनं 2014मध्ये विम्बल्डन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. 8 / 10त्याचवर्षी तिनं ऑस्ट्रेलिया आणि फ्रेंच ओपनमध्ये उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. 9 / 10 2017मध्ये ती अशाच एका चाहत्यासोबत डेटवर गेली होती. त्यानंतर जॉन गेरेके नावाच्या चाहत्यासोबत डेटवर गेली होती.10 / 10तिच्या सौंदर्याचे जगभरात लाखो चाहते आहेत.