ख्रिसमसच्या निमित्ताने सँटा क्लॉज बनली मोनालिसा, फोटो झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2020 04:58 PM2020-12-25T16:58:47+5:302020-12-25T16:58:47+5:30

मोनालिसा भोजपुरी जगतातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. मोनालिसा ग्लॅमरस फोटो शेअर करून बऱ्याचदा चर्चेत येत असते.

ख्रिसमसच्या निमित्ताने मोनालिसाने ग्लॅमरस सँटा क्लॉजचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जे खूप व्हायरल होत आहेत.

मोनालिसा सँटा क्लॉजच्या गेटअपमध्ये चाहत्यांना खूप भावते आहे. तिने फोटो शेअर करत चाहत्यांना मेरी ख्रिसमस केले आहे.

मोनालिसा बिग बॉसच्या दहाव्या सीझनमध्ये सहभागी झाली होती.

मोनालिसाने भोजपुरीसोबत बंगाली, कन्नड, हिंदी आणि तमीळ चित्रपटात काम केले आहे.

मोनालिसाने आपल्या सिनेकारकीर्दीची सुरूवात 1999 साली ओडिया सिनेमा जय श्री राममधून केली होती.

मोनालिसाने 2005 साली ब्लॅकमेल या हिंदी चित्रपटात काम केले होते.

मोनालिसा सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. तिचे इंस्टाग्रामवप 3.9 मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.