प्रार्थनाची क्रेझ काही थांबेना; पुन्हा शेअर केले साडीतील सुंदर फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 07:40 PM2022-05-04T19:40:44+5:302022-05-04T19:44:58+5:30

Prarthana behere:या फोटोशूटसाठी प्रार्थनाने खास पैठणी साडी नेसली असून त्यावर सिव्हलेस ब्लाऊज परिधान केलं आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या प्रार्थनाचा गेल्या काही दिवसांपासून कलाविश्वातील वावर वाढला आहे.

अलिकडेच फोटोशूटमधील काही फोटो शेअर करणाऱ्या प्रार्थनाने नवे फोटो शेअर केले आहेत.

अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधत प्रार्थनाने पारंपरिक वेशात फोटोशूट केलं आहे.

या फोटोशूटसाठी प्रार्थनाने खास पैठणी साडी नेसली असून त्यावर सिव्हलेस ब्लाऊज परिधान केलं आहे.

प्रार्थनाने या साडीतील लूक पूर्ण व्हावा यासाठी त्यावर दागिनेही घातले आहेत.

प्रार्थनाने नाकात नथ घातलेला फोटो नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

प्रार्थनाने प्रत्येक फोटोसाठी वेगवेगळी पोझ दिली आहे.

या फोटोमध्ये प्रार्थनाचं सोज्वळ रुप दिसून येत आहे. त्यामुळेच तिचे हे फोटो व्हायरल होत आहेत.

या फोटोमध्ये प्रार्थनाची संपूर्ण पैठणी पाहता येते.