Photos: साज ह्यो तुझा..! रुपालीचा मोहक अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 12:04 PM2021-10-18T12:04:19+5:302021-10-18T12:10:20+5:30

Rupali bhosale:उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्याच्या जोरावर आज रुपालीचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं.

'आई कुठे काय करते' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले.

या मालिकेत संजना ही भूमिका साकारून रुपालीने तिच्या अभिनयाची एक वेगळी बाजू प्रेक्षकांसमोर सादर केली.

उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्याच्या जोरावर आज रुपालीचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं.

रुपाली सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा तिच्या फोटोशूटमधील काही फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.

अलिकडेच रुपालीने दसऱ्याचं निमित्त साधत एक फोटोशूट केलं होतं. या फोटोशूटपैकी काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

रुपालीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने पारंपरिक साजशृंगार केला असून ती अत्यंत सुंदर दिसत आहे.

नऊवारी साडी त्यावर भरगच्च दागदागिने यामुळे रुपालीच्या सौंदर्यात भर पडल्याचं पाहायला मिळतं.

'आई कुठे काय करते' या मालिकेव्यतिरिक्त रुपाली 'मन उधाण वाऱ्याचे', 'दोन किनारे दोघी आपण', 'कन्यादान' या मालिकांमध्ये झळकली आहे. 'स्वप्नांच्या पलीकडले', 'शेजारी शेजारी पक्के शेजारी', 'महासंग्राम', 'दिल्या घरी तू सुखी राहा' या मालिकांमधून तिने आपले अभिनय गुण दाखवले आहेत.

'आयुषमान भव', 'कसमे वादे', 'बडी दूर से आये हैं', 'तेनाली रामा' या हिंदी मालिकांमध्येही ती झळकली आहे. 'रिस्क' या हिंदी तर 'चांदी' या मराठी चित्रपटांमध्येही तिने काम केलं आहे.

Read in English