शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तुमचं नाव, फोन नंबर, पत्ता सगळंच विकलं; ३४ कोटी भारतीयांना धोका, सावध व्हा, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2021 6:34 AM

1 / 5
फेसबुकवर बिनधास्त वावरत असाल आणि अकाउंट सुरू करून निश्चिंत असाल, तर सावध व्हा. कारण, जगभरातील १५० कोटी फेसबुक यूजर्सचा डेटा चोरीला गेला असून, हॅकर्सनी त्याच्यातून कोट्यवधी रुपये कमावल्याचा संशय आहे.
2 / 5
केवळ तुमच्या नावापासून ते फोन नंबरपर्यंत सारी माहिती डार्कवेबवर उपलब्ध झाली आहे. त्यामुळे या माहितीचा गैरवापर झाल्यास... तुमचं बरंच नुकसान होऊ शकतं. ३४ कोटी फेसबुक यूजर्स भारतात आहेत. २८५ कोटी लोक फेसबुकवर ॲक्टिव्ह असतात. कोणता डेटा झाला चोरी? हे जाणून घेऊया
3 / 5
१. तुमचे नाव, २. फोन नंबर, ३. इमेल आयडी, ४. यूजर आयडी, ५. तुम्ही राहता तो भाग कोणता, ६. महिला/पुरूष जवळपास १५० कोटी फेसबुक यूजर्सच्या डेटातून हॅकर्सनी कोट्यवधी कमावले असून ही माहिती समोर आल्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे.
4 / 5
डेटा चोरी झाल्यामुळे काय होऊ शकते?, तुमच्या फेसबुक अकाउंटची सुरक्षाच धोक्यात येऊ शकते. या डेटाच्या माध्यमातून हॅकर तुमचे अकाउंट रिसेट करू शकतो. तुमचा पासवर्ड बदलू शकतो आणि कोणतीही पोस्ट तुमच्या फेसबुकवर वॉलवर टाकू शकतो.
5 / 5
तुम्हाला ब्लॅकमेलही करू शकतो. त्यातून पैसेही उकळू शकतो. आपण सावज कसे होतो? हॅकर्स एखादा गेम, नवे फिचरची भूरळ यूजर्सना घालतात. त्यातील प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर तुमच्या फेसबुक अकाउंटमधील तुमची माहिती सहजरित्या हॅकर्सच्या हाती लागते.
टॅग्स :Facebookफेसबुक