शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

व्हॉट्सअ‍ॅप-इंस्टाग्राम राहिले मागे, गुगल प्ले आणि अ‍ॅप्स स्टोअर्समधून ‘हे’ अ‍ॅप सर्वाधिक डाऊनलोड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 4:21 PM

1 / 11
ज्याची त्याची स्क्रीन या अ‍ॅप्सनी भरलेली दिसते. ही अ‍ॅप्स जर आपल्या मोबाइलमध्ये नसली तर आपलं आयुष्य जणू थांबेल, असे विशेषतः तरुणाईला वाटत असतं. 2022च्या पहिल्या तिमाहीत जगभरात सगळ्यात अधिक डाऊनलोड केली गेलेली ही अ‍ॅप्स तरुणाईच प्रतिबिंब दाखवतात..
2 / 11
टिकटॉक हे अ‍ॅप 2021 साली आघाडीवर होतं आणि ते स्थान टिकटॉकनं कायम राखलं आहे.
3 / 11
इंस्टाग्रामची लोकप्रियता रिल्स फिचरमुळे पुन्हा एकदा वाढली आहे. फोटो शेयरिंग अ‍ॅप ही ओळख मागे टाकत आता व्हिडीओजवर जास्त भर देण्यात आला आहे.
4 / 11
2021 हे वर्ष मेटा (फेसबुक) साठी डोकेदुखीचे ठरले असले, तरी पहिल्या दहामध्ये आजची चार अ‍ॅप्स आहेत.
5 / 11
व्हॉट्सअ‍ॅपवर सध्या 200 मिलियनपेक्षा जास्त अ‍ॅक्टिव्ह युजर्स आहेत.
6 / 11
शॉपी हे दक्षिण आशिया आणि तैवानमधील लोकप्रिय शॉपिंग अ‍ॅप आहे.
7 / 11
टेलिग्रामकडे व्हॉट्सअ‍ॅपचा पर्याय म्हणून बघितलं जातं. या मेसिजिंग अ‍ॅपच्या प्रायव्हसी फीचर्सचं कौतुक युजर्स करत असतात.
8 / 11
जगभरात 30 कोटी लोक स्नॅपचॅट अ‍ॅप वापरतात.
9 / 11
फेसबुकची मेसेंजर सेवा कंपनीनं वेगळी केल्यापासुन मित्रांशी संपर्कात राहण्यासाठी हे अ‍ॅप डाउनलोड करावं लागतं, अशी तक्रार देखील काही युजर्स करत असतात.
10 / 11
कॅपकट हे व्हिडीओ एडिटिंग अ‍ॅप टिकटॉकच्या पॅरेंट कंपनी बाईटडान्स तयार केलेले आहे.
11 / 11
स्पॉटीफाय हे लोकप्रिय म्युजिक स्ट्रीमिंग अ‍ॅप आहे, जिथे गाणी आणि पॉडकास्ट ऐकता येतात.