WhatsApp मध्ये लवकरच दोन नवीन फीचर्स, अनेक डिव्हाइसवर वापरता येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2020 16:22 IST
1 / 9इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपमध्ये नवीन अॅडव्हॉन्स सर्च ऑप्शन दिला जाणार आहे. सध्या व्हॉट्सअॅपच्या बीटा व्हर्जनमध्ये हे फीचर देण्यात आले आहे.2 / 9 WABetainfo च्या अहवालानुसार व्हॉट्सअॅप 2.20.118 अँड्रॉइड बीटामध्ये अॅडव्हॉन्स सर्च मोडचा ऑप्शन दिला आहे.3 / 9अहवालानुसार व्हॉट्सअॅप आपल्या यूजर इंटरफेसवर काम करत आहे. या फीचरअंतर्गत, युजर्स मेसेज टाइपच्या माध्यातून व्हॉट्सअॅपवर सर्च करू शकतील.4 / 9WABetainfo ने स्क्रीनशॉट देखील शेअर केले आहेत. येथे फीचर सर्च मोडमध्ये फोटो, व्हिडिओ, लिंक्स, गिफ्ट्स, ऑडिओ आणि डॉक्युमेंट्सचा ऑप्शन दिसू शकतो. म्हणजेच, या कॅटगरीमध्ये युजर्ससाठी सर्च करणे सोपे होईल.5 / 9सध्या या फिचरचे डेव्हलपमेंट सुरू आहे. या फीचर्सला काही काळानंतर कंपनी अंतिम बिल्डद्वारे युजर्सपर्यंत अपडेट आणू शकते. 6 / 9हे फीचर फक्त अँड्रॉईडसाठी असणार की आयफोन यूजर्सना सुद्धा दिले जाणार, याबाबत अद्याप स्पष्ट झाले नाही.7 / 9व्हॉट्सअॅपशी संबंधित दुसर्या अहवालाविषयी बोलताना एक मोठे फीचर टेस्टिंगच्या टप्प्यात आहे. लिंक्ड डिव्हाइसच्या या फीचरनुसार, येत्या काळात व्हॉट्सअॅप एकाचवेळी एकापेक्षा जास्त स्मार्टफोनमध्ये वापरले जाऊ शकते.8 / 9WABetainfo द्वारे शेअर केलेल्या स्क्रीन शॉटमध्ये असे दिसून येते की, व्हॉट्सअॅप अकाऊंट वेगवेगळ्या डिव्हाइससोबत सिंक करण्याचा ऑप्शन आहे. म्हणजेच व्हॉट्सअॅपला सिंक करून एकाच वेळी एकापेक्षा जास्त स्मार्टफोनमध्ये वापरता येऊ शकेल.9 / 9ही दोन्ही फीचर्स एकाचवेळी लाँच करण्याची शक्यता आहे. कारण, व्हॉट्सअॅपची ही दोन्ही फीचर्स बीटा व्हर्जनमध्ये देण्यात आली आहेत. पण, सध्या या दोनही फिचर्स टेस्टिंगच्या टप्प्यात आहेत.