WhatsApp ने पुन्हा आणले ४ दमदार फीचर्स; आता ऑडिओ, व्हिडीओ कॉलची मजा होणार दुप्पट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 14:19 IST
1 / 7WhatsApp आपल्या युजर्ससाठी रोज नवनवीन फीचर्स घेऊन येत आहे. या फीचर्समुळे युजर्सना खूप मदत होते. युजर कम्युनिकेशन सुधारण्यासाठी चार नवीन फीचर्सवर काम करत असल्याचं कंपनीने आता म्हटलं आहे.2 / 7युजर कम्युनिकेशन सुधारण्यासाठी चॅट मेसेज ट्रान्सलेट फीचर येत असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. हे युजर्सना ग्रुप कॉलमध्ये पार्टिसिपेंट्स निवडण्याची आणि व्हिडीओ कॉल दरम्यान स्नॅप आणि इन्स्टा-सारखे पप्पी इअर्स सारखे मजेदार इफेक्ट्स वापरण्याची परवानगी देतं.3 / 7याआधी WhatsApp ग्रुपमध्ये कॉल केल्यावर ग्रुपमध्ये उपस्थित असलेल्या सर्व सदस्यांना एकाच वेळी नोटिफिकेशन मिळायचं. त्यांच्यापैकी ज्यांना पाहिजे असेल ते जॉईन होऊ शकतात. 4 / 7आता WhatsApp ने ही सुविधा दिली आहे की, तुम्ही पार्टिसिपेंट्स निवडू शकता. याचा फायदा असा होईल की, या कॉलमुळे संपूर्ण ग्रुपला त्रास होणार नाही. यामध्ये तुम्ही निवडलेल्या लोकांनाच नोटिफिकेशन मिळेल.5 / 7WhatsApp ने आता व्हिडीओ कॉल्स अधिक मजेदार बनवले आहेत. आता तुम्ही व्हिडिओ कॉल दरम्यान वेगवेगळे इफेक्ट्स निवडू शकता. 6 / 7आता तुम्हाला कॉल सुरू करण्यासाठी किंवा कॉलसाठी लिंक तयार करण्यासाठी किंवा डायरेक्ट नंबर डायल करण्यासाठी सर्व प्रकारच्या सुविधा सहज मिळतील.7 / 7WhatsApp ने व्हिडिओचा दर्जा आणखी चांगला केला आहे. तुम्ही तुमच्या मोबाइल किंवा डेस्कटॉप ॲपवरून व्हिडीओ कॉल केल्यास, तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त रिझोल्यूशनसह व्हिडीओ दिसेल. खूप दिवसांपासून याची गरज होती.