Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 20:03 IST
1 / 5आयक्यूओओ १३: विवोच्या सब-ब्रँडचा हा गेमिंग फोन आहे. भारतात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसरसह लॉन्च होणारा हा पहिला फोन आहे. यात १६ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज मिळतो. फोनच्या मागील बाजूस अल्ट्रा-वाइड, टेलिफोटो आणि मुख्य कॅमेरासह तीन ५० मेगापिक्सेल कॅमेरे आहेत. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ३२ मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. तर, ६००० एमएएचची बॅटरी मिळते, जी १२० वॅट सुपरफास्ट चार्जिंकला सपोर्ट करते. या फोनची किंमत ५४ हजार ९९९ पासून सुरू होते.2 / 5वनप्लस १३ एस: ५ हजार ८५० एमएएच क्षमतेच्या बॅटरीसह लॉन्च झालेल्या वनप्लस १३ स्मार्टफोनची किंमत ५२ हजार ९९९ रुपये इतकी आहे. यात ग्राहकांना १२ जीबीपर्यंत रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेजपर्यंत व्हेरिएंट मिळतात. या स्मार्टफोनमध्ये ५० मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आणि ३२ मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा मिळतो.3 / 5सॅमसंग गॅलेक्सी एस २५: या वर्षी लाँच झालेल्या सॅमसंगच्या फ्लॅगशिप फोन गॅलेक्सी एस२५ मध्येही दमदार फीचर्स मिळतात. यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८ एली प्रोसेसर आहे. यात १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज आहे. या सॅमसंग फोनमध्ये ४००० एमएएच बॅटरी आहे आणि वायर्ड आणि वायरलेस चार्जिंग दोन्हीला सपोर्ट करते. यात ५० एमपीचा मुख्य कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी १२ एमपीचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे, या स्मार्टफोनची किंमत ७४ हजार ९९९ आहे.4 / 5गुगल पिक्सेल १०: गुगलचा हा फ्लॅगशिप फोन अनेक एआय फीचर्सने सुसज्ज आहे. कंपनीने तो टेन्सर जी५ प्रोसेसरसह लॉन्च केला आहे, जो १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. गुगलचा हा फ्लॅगशिप फोन ४९७० एमएएच बॅटरीसह येतो आणि वायर्ड आणि वायरलेस चार्जिंग दोन्हीला सपोर्ट करतो. यात मागील बाजूस ४८ मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा मिळतो. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी १०.५ मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनची किंमत ७९ हजार ९९९ रुपये इतकी आहे.5 / 5आयफोन १७: या वर्षी लॉन्च झालेला हा आयफोन सर्वाधिक विक्री होणाऱ्या फोनपैकी एक आहे. दरवर्षीप्रमाणे, या नवीन आयफोन मॉडेलला वापरकर्त्यांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. या आयफोनमध्ये A19 बायोनिक चिपसह अनेक प्रमुख अपग्रेड्स आहेत. यात ४८ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि १८ मेगापिक्सेलचा सेंटर-स्टेज सेल्फी कॅमेरा देखील आहे. हा आयफोन १ टीबी पर्यंत स्टोरेजसह खरेदी करता येतो, त्याची सुरूवाती किंमत ८२ हजार ९०० आहे.