म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
लॅपटॉपची बॅटरी लाईफ वाढवण्यासासाठी 'या' आहेत काही खास टिप्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2018 17:41 IST
1 / 6ऑफिस आणि घर या दोन्ही ठिकाणी काम करण्यासाठी लॅपटॉपचा वापर मोठ्याप्रमाणावर केला जातो. मात्र अनेकदा खूप काम असल्याने लॅपटॉपची बॅटरी लवकर लो होते त्यामुळे कामच्याच वेळी तो बंद होतो. पण आता काळजी करायचं काही कारण नाही कारण लॅपटॉपची बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी काही टिप्स आहेत. त्या खास टिप्सबाबत जाणून घेऊया. 2 / 6लॅपटॉपला अन्य डिवाईस कनेक्ट केल्यास बॅटरी लवकर लो होते. माऊस, पेन ड्राईव्ह आणि प्रिंटरसारख्या अनेक गोष्टी कनेक्ट असल्यास बॅटरी कमी होते. त्यामुळेच ज्याचा तुम्ही वापर करत नाहीत ते डिवाईस कनेक्ट करू नका म्हणजेच बॅटरी लाईफ वाढेल.3 / 6लॅपटॉपचा बॅटरी बॅकअप वाढवण्यासाठी पावर सेटिंगमध्ये बदल करणं गरजेचं आहे. लॅपटॉपच्या बॅटरीसाठी पावर सेव्हिंग या पर्यायावर क्लिक करा. त्यामध्ये ब्राईटनेस आणि अन्य काही सेटिंग्स बदलून बॅटरी लाईफ वाढवता येते.4 / 6लॅपटॉपचा वापर करत असताना तापमान हे सामान्य तापमानापेक्षा अधिक असल्यास लॅपटॉप लवकर तापतो. मात्र लॅपटॉप अशाप्रकारे गरम होणं चांगलं नाही तसेच बॅटरीसाठीही ते सेफ नाही त्यामुळे लॅपटॉप उन्हात चार्ज करू नका तसेच लॅपटॉपच्या शेजारी गरम वस्तू असू नयेत. 5 / 6लॅपटॉपमध्ये अनेकदा सीडी किंवा डीवीडी डिस्क असतात. मात्र त्यामुळे बॅटरी लवकर लो होते. त्यामुळेच त्याचा वापर करत नसाल तर लॅपटॉपमधून ती काढा. 6 / 6लॅपटॉपमध्ये अनेक अॅप्स असतात ज्यांचा आपण वापर जास्त करत नाही मात्र हे अॅप्स आपली बॅटरी लो करत असतात. त्यामुळे Task Manager Feature च्या मदतीने हे अॅप्स बंद करा.