शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कॉल, चार्जिंग करताना स्मार्टफोन गरम होतो का? या टिप्स ठेवतील तुमचा फोन कूल

By सिद्धेश जाधव | Published: December 27, 2021 6:31 PM

1 / 8
हेवी गेम खेळताना आणि ब्राउजिंग करताना सर्वच फोन थोडेफार गरम होतात. परंतु डिवाइस जास्त गरम झाल्यास तुमच्या फोनमध्ये समस्या असू शकते.
2 / 8
बऱ्याचदा चार्जिंग दरम्यान देखील फोन गरम होतो. चार्जिंग सुरु असताना फोन गरम होऊन स्फोट झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. परंतु या ओव्हर हीटिंगवर देखील अनेक उपाय आहेत.
3 / 8
कधी-कधी तुमच्या फोनची स्टोरेज फोनला हिट करते तर कधी फोनच्या सिस्टम कोडमध्ये बग असू शकतो. चला जाणून घेऊया स्मार्टफोनच्या ओव्हर हीटिंगची कारणं आणि त्यावरील उपाय.
4 / 8
1.स्मार्टफोनमध्ये जास्त अ‍ॅप्स आणि गेम्स डाउनलोड केल्यामुळे ओव्हर हीटिंगची समस्या येऊ शकते. 2.फोनचं कॉम्युनिकेशन यूनिट आणि कॅमेरा देखील तापमान वाढवू शकतात. 3.अनेक फोन चार्जिंग, ब्राउजिंग आणि कॉलिंग दरम्यान देखील तापतात.
5 / 8
गरज नसल्यास डेटा GPS, ब्लूटूथ, वायफाय सारखे अनेक फंक्शन बंद करावेत. हे फंक्शन्स फक्त बॅटरी खात नाहीत तर फोनचे तापमान वाढवण्यास देखील कारणीभूत असतात.
6 / 8
फोनच्या बॅकग्राउंडमध्ये एक साथ अनेक अ‍ॅप्स सुरु ठेवल्यास देखील फोन गरम होऊ शकतो. फोनचा रॅम वेळोवेळी क्लीन करत रहा.
7 / 8
चार्जिंग करताना अनधिकृत चार्जरचा वापर केल्यास स्मार्टफोन हिट होऊ शकतो. त्यामुळे कंपनीने सोबत दिलेला किंवा कंपनीच्या अधिकृत स्टोर किंवा वेबसाईटवरून घेतलेला चार्जर वापरावा.
8 / 8
फोनचे अ‍ॅप्स तसेच ऑपरेटिंग सिस्टम अपडेटेड ठेवावी. कधी-कधी सॉफ्टवेयर मधील बग ओव्हरहीटिंगचे कारण ठरू शकतो. हा बग अपडेटमधून दूर केला जाऊ शकतो.
टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान