'हे' आहेत दहा हजारापेक्षा कमी किंमतीतील दमदार स्मार्टफोन्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 16:03 IST
1 / 6स्मार्टफोन हा प्रत्येकाच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. मात्र दिवसागणिक त्याच्या किमती वाढत आहेत. सर्वसामान्यांना परवडेल अशा किंमतीत काही स्मार्टफोन्स बाजारात उपलब्ध आहेत. दहा हजारापेक्षा कमी किंमतीतील दमदार स्मार्टफोन्सविषयी जाणून घेऊया. 2 / 6Realme C1 या स्मार्टफोनमध्ये 6.2 एचडी स्क्रिन देण्यात आली असून 7,999 रुपयांना हा फोन उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये 2 जीबी रॅम आणि 16 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. 3 / 6Redmi 6A या स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा तर 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये 5.45 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला असून 2 जीबी रॅम आणि 16 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. 4 / 6Honor 7C या स्मार्टफोमध्ये 5.99 एचडी प्लस डिस्प्ले सोबतच 13+2 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. 9,999 रुपयांना हा फोन उपलब्ध आहे. 5 / 6Infinix Note 5 या स्मार्टफोनची किंमत 9,999 असून 5.9 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 3 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. 6 / 6Redmi Note 5 या स्मार्टफोनमध्ये 6 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला असून या फोनची किंमत 9,999 रुपये आहे.