जगातील सगळ्यात लहान ५ मोबाइल फोन; अगदी माचिसच्या डबीतही लपवून ठेवू शकता!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 17:11 IST
1 / 7बहुतेक लोकांच्या हातात मोठ्या स्क्रीनचे स्मार्टफोन पाहिले असतील, परंतु, अजूनही लहान आणि कॉम्पॅक्ट फीचर फोनची लोकप्रियता अजूनही अबाधित आहे. एक विशेष युजर गट असा आहे, ज्यांना मिनी फोन अजूनही आवडतात. हे मोबाईल त्यांच्या लहान आकारात असूनही कॉलिंग, मेसेजिंग आणि काही प्रकरणांमध्ये कॅमेरासारख्या सुविधा देखील प्रदान करतात.2 / 7असे '५' सर्वात लहान मोबाईल फोन आहेत, जे केवळ तांत्रिकदृष्ट्या मनोरंजक नाहीत तर अत्यंत हलके आणि पोर्टेबल देखील आहेत.3 / 7झँको टायनी टी१ : हा जगातील सर्वात लहान मोबाईल आहे, जो फक्त ४६.७ मिमी लांब आणि फक्त १३ ग्रॅम वजनाचा आहे. यात ०.४९ इंचाचा ओएलईडी स्क्रीन, २जी नेटवर्क सपोर्ट आणि ३०० कॉन्टॅक्ट्स साठवण्याची सुविधा आहे. त्याची २०० एमएएच बॅटरी ३ दिवस स्टँडबाय मोडमध्ये टिकते. हा इतका लहान आहे की तो खिशात किंवा आगपेटीत सहज ठेवता येतो.4 / 7झँको टायनी टी२ : टाईनी टी२ हे टाईनी टी१ चे अपग्रेडेड व्हर्जन आहे. यात ३जी सपोर्ट, कॅमेरा, १२८ एमबी रॅम आणि ६४ एमबी इंटरनल स्टोरेज आहे. त्याचे वजन फक्त ३१ ग्रॅम आहे आणि बॅटरी बॅकअप सुमारे ७ दिवसांचा आहे. या फोनवर तुम्ही म्युझिक, व्हिडीओ आणि बेसिक गेम्सचा आनंद देखील घेऊ शकता.5 / 7युनिहर्ट्झ जेली २ : हा जगातील सर्वात लहान ४जी स्मार्टफोन मानला जातो. यात ३ इंचाची स्क्रीन, अँड्रॉइड ११, ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज आहे. यात फेस अनलॉक, GPS, कॅमेरा, वाय-फाय आणि गुगल प्ले स्टोअर सपोर्ट देखील आहे. याचे वजन फक्त ११० ग्रॅम आहे पण त्याचे फीचर्स मोठ्या फोनसारखे आहेत.6 / 7लाईट फोन २: हा फोन त्यांच्यासाठी आहे ज्यांना फक्त कॉल आणि मेसेजसाठी मोबाईल वापरायचा आहे. यात ई-इंक डिस्प्ले आहे आणि तो ४ जी नेटवर्कला सपोर्ट करतो. यात सोशल मीडिया, गेम किंवा अॅप्स नाही - फक्त आवश्यक असणारे लहान आकार, प्रीमियम डिझाइन आणि दीर्घ बॅटरी लाइफ हे फीचर्स आहेत. 7 / 7क्योसेरा केवाय-०१एल : या फोनला 'जगातील सर्वात पातळ मोबाईल' म्हटले जाते. त्याची जाडी फक्त ५.३ मिमी आणि वजन ४७ ग्रॅम आहे. यात २.८ इंचाचा मोनोक्रोम स्क्रीन आहे आणि तो फक्त कॉल, मेसेज आणि ब्राउझिंगसाठी वापरता येतो. जपानमध्ये खूप लोकप्रिय असलेला हा फोन क्रेडिट कार्डसारखा दिसतो.