Samsung कडून न्यू ईयरचं गिफ्ट; TV विकत घेतल्यास साउंडबार आणि टॅबलेट मोफत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 18:30 IST
1 / 6सॅमसंग बिग टीव्ही डेज सेलमध्ये 55-इंचापेक्षा मोठ्या नियो QLED 8K TVs, QLED TV आणि UHD TV या मॉडेल्सवर निश्चित ऑफर आणि विशेष डील दिली जात आहे. 2 / 6काही मॉडेल्स सोबत कंपनीनं साऊंडबार मोफत देत आहे. तर काही टीव्ही मॉडेल्ससह सॅमसंग टॅब मिळत आहे. चला जाणून घेऊया या सेलमधील ऑफर्स. 3 / 6सॅमसंग बिग टीव्ही डेज सेलमध्ये 85-इंच आणि 75-इंचाच्या नियो QLED 8K TV च्या खरेदीवर 94,990 रुपयांचा साउंडबार मोफत मिळेल. 4 / 665-इंच नियो QLED 8K TV, 75-इंच UHD TV, 65-इंच आणि 55-इंच नियो QLED TV, 65-इंच आणि 55-इंचाच्या QLED TV विकत घेतल्यास गॅलेक्सी A7 LTE टॅब मोफत मिळेल. या टॅबची किंमत 21,999 रुपये आहे. 5 / 6या सेलमध्ये 20% पर्यंत कॅशबॅक आणि एक्सटेंडेड वॉरंटी देखील मिळेल. तसेच फक्त 1,990 रुपयांच्या ईएमआयवर सॅमसंगचे 55-इंचापेक्षा मोठे टीव्ही विकत घेता येतील. 6 / 6ऑफर अंतर्गत सॅमसंग QLED TV 10 वर्षांच्या अतिरिक्त नो-स्क्रीन बर्न-इन वॉरंटीसह विकत घेता येतील. इतर सॅमसंग TV मॉडेलवर एक वर्षांची स्टँडर्ड आणि वर्षाची अतिरिक्त वॉरंटी देखील मिळेल.