Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 10:56 IST
1 / 8Reliance Jio : मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वातील रिलायन्स Jio सातत्याने नवनवीन डिव्हाईस लॉन्च करत राहते. आता कंपनीने एक नवीन स्मार्ट क्लाउड-आधारित व्हर्च्युअल डेस्कटॉप सर्व्हिस JioPC लॉन्च केले आहे. याद्वारे तुम्ही तुमच्या घरातील टीव्हीचा कॉम्प्युटर म्हणून वापर करू शकता. यासाठी तुम्हाला कोणत्याही वेगळ्या CPU ची आवश्यकता नाही. तुम्हाला फक्त Jio सेट-टॉप बॉक्स बसवावा लागेल. 2 / 8JioPC कसे काम करते? JioPC साठी तुम्हाला तुमच्या टीव्हीला कीबोर्ड आणि माउस कनेक्ट करावा लागेल. महत्वाची गोष्ट म्हणजे, JioPC पूर्णपणे क्लाउडवर चालतो. त्याची ऑपरेटिंग सिस्टम Ubuntu (Linux) आहे. यामध्ये तुम्ही वेब ब्राउझिंग, ऑनलाइन अभ्यास, कोडिंग आणि डॉक्युमेंट एडीट यासारखी महत्त्वाची कामे करू शकता. सध्या ही सर्व्हिस वेबकॅम आणि प्रिंटर सारख्या उपकरणांना सपोर्ट करत नाही.3 / 8किंमत किती आहे? JioPC सेवा पे-अॅज-यू-गो मॉडेलवर दिली जात आहे. याचा अर्थ तुम्ही ती कोणत्याही दीर्घकालीन कराराशिवाय चालवू शकता. त्याची सुरुवातीची किंमत प्रति महिना 599 + GST आहे. परंतु जर तुम्ही तीन महिन्यांचा प्लॅन घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला एक महिन्याचे सबस्क्रिप्शन मोफत मिळेल. या प्लॅनची किंमत १,४९९ रुपये आहे. त्यानुसार, तुम्ही ४ महिन्यांसाठी या सेवेचा लाभ घेऊ शकाल.4 / 8जर तुम्हाला त्याचा वार्षिक प्लॅन घ्यायचा असेल, तर तुम्हाला त्यात इत फायदे देखील मिळत आहेत. कंपनी या प्लॅनमध्ये ३ महिने अतिरिक्त देत आहे. याचा अर्थ १२ महिने आणि त्या ३ महिन्यांच्या अतिरिक्त प्लॅनसह तुम्ही १५ महिने आनंद घेऊ शकता. या वार्षिक प्लॅनची किंमत ४,५९९ रुपये आहे.5 / 8तुम्हाला काय मिळेल? व्हर्च्युअल मशीनमध्ये तुम्हाला ४ सीपीयू, ८ जीबी रॅम आणि १०० जीबी क्लाउड स्टोरेज मिळेल. लिबर ऑफिससारखे बेसिक सॉफ्टवेअर त्यात आधीच इन्स्टॉल केलेले आहे. त्यात ब्राउझरद्वारे मायक्रोसॉफ्ट ऑफिसदेखील अॅक्सेस करता येते.6 / 8खास गोष्ट म्हणजे सुरुवातीला तुम्हाला १ महिन्याची ट्रायल मोफत मिळतो. ज्यामध्ये जिओ वर्कस्पेस आणि ५१२ जीबी अतिरिक्त क्लाउड स्टोरेज दिले जाते. त्यामध्ये अॅडोब एक्सप्रेस देखील मोफत उपलब्ध असेल. याद्वारे तुम्ही ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट क्रिएशन करू शकता.7 / 8सेटअप कसा करायचा? त्याच्या सेटअपसाठी तुम्हाला जिओ सेट-टॉप बॉक्स चालू करावा लागेल. अॅप्स विभागात जाऊन JioPC अॅप उघडा. यानंतर मोबाईल नंबरसह नोंदणी करा. तुम्ही लॉगिन करताच तुमचा क्लाउड डेस्कटॉप तयार होईल. आता तुम्ही तुमचा टीव्ही संगणकासारखा वापरू शकता.8 / 8ही सेवा चालविण्यासाठी वेगवान इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे. कारण सर्व प्रक्रिया जिओच्या क्लाउड सर्व्हरवर होतात, ज्यासाठी चांगली इंटरनेट कनेक्टिव्हिटी असणे खूप महत्वाचे आहे.