शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ZOOMला टक्कर देण्यासाठी अंबानींची जिओ मैदानात; JioMeet अ‍ॅप केलं लाँच

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2020 12:31 PM

1 / 10
लोकप्रिय व्हिडीओ कॉन्फरन्सिंग अॅप असलेल्या झूमला टक्कर देण्यासाठी रिलायन्स जिओ मैदानात उतरली आहे. जिओनं JioMeet व्हिडीओ कॉलिंगचं ऍप गुरुवारी रात्री लाँच केले.
2 / 10
काल रात्री कंपनीने आपले नवीन विनामूल्य व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अॅप JioMeet लाँच केले असून, ते थेट झूम ऍपला टक्कर देणार आहे.
3 / 10
हे अॅप गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅप स्टोअरमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. जवळपास एका महिन्यासाठी हे अॅप काही वापरकर्त्यांसाठी बीटा व्हर्जनमध्ये उपलब्ध करून देण्यात आले होते, पण त्याचा विस्तार करण्यात आला आहे.
4 / 10
JioMeetमध्ये एचडी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगला सपोर्ट देण्यात आल्याचा दावा कंपनीनं केला आहे. झूम ऍपप्रमाणेच यातही 100 लोक सहभागी होऊ शकतात.
5 / 10
वापरकर्ते त्यात त्यांचा ईमेल आयडी किंवा फोन नंबरसह साइन अप करू शकतात. हे वापरण्यास विनामूल्य आहे आणि वापरकर्ते एका दिवसात अमर्यादित बैठका घेऊ शकतात.
6 / 10
तसेच या बैठका पासवर्डनं सुरक्षित असणार आहेत आणि त्यामध्ये झूमसारखे प्रतीक्षा कक्ष देखील उपलब्ध असतील.
7 / 10
ब्राऊझरमधून थेट अ‍ॅपवर प्रवेश करता (केवळ क्रोम किंवा फायरफॉक्स) येतोच, शिवाय ते विंडोज, मॅक, iOS आणि Android वर देखील डाऊनलोड करता येऊ शकते. यासाठीची लिंक जिओ साइटवर देण्यात आली आहे.
8 / 10
JioMeet अ‍ॅपचा इंटरफेस अगदी सोपा आहे आणि तो थोडा झूमसारखा दिसत आहे. कंपनीने अशी माहिती दिली आहे की, त्यामध्ये सुमारे 5 उपकरणांमध्ये मल्टी-डिव्हाइस लॉगिन देण्यात आले आहे.
9 / 10
कॉल चालू असताना वापरकर्ते सहजपणे डिव्हाइसदरम्यान स्विच करू शकतात.
10 / 10
तसेच सुरक्षित ड्राइव्हिंग मोड असे एक वैशिष्ट्य देखील आहे. या सर्व व्यतिरिक्त, त्यात स्क्रीन सामायिकही करता येते ही वैशिष्ट्यसुद्धा देण्यात आली आहेत.
टॅग्स :Jioजिओ