By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 15:10 IST
1 / 9चीनची मोबाईल कंपनी Xiaomi ने उपकंपनी रेडमीचा 48 मेगापिक्सलचा कॅमेरा असलेला तिसरा फोन लाँच केला आहे. वेगळे म्हणजे या फोनमध्ये 20 मेगापिक्सलचा पॉपअप सेल्फी कॅमेरा देण्यात आला असून आधीच्या दोन फोनपेक्षा किंमत जास्त आहे. 2 / 9रेडमीचे दोन फोन नोट 7 एस आणि नोट 7 प्रो यामध्ये 48 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. तसेच पाठीमागे 48 मेगापिक्सलसह तीन कॅमेरे देण्यात आले आहेत. 3 / 9रेडमीच्या के20 मध्ये स्नॅपड्रॅगन 730 हा प्रोसेसर देण्यात आला आहे. या प्रोसेसरचा हा पहिलाच भारतातील स्मार्टफोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे. तसेच बॉक्समध्ये 18 वॅटचा फास्ट चार्जरही देण्यात आला आहे. 4 / 9हा फोन दोन प्रकारात बाजारात आणण्यात आला असून रेडमी K20 आणि K20 Pro असे मॉडेल आहेत. यापैकी K20 ची किंमत 6/64 जीबीसाठी 21999 आणि 6/128 जीबीसाठी 23999 रुपये ठेवण्यात आली आहे. 5 / 9K20 Pro ची किंमत 8/256 जीबी 30,999 आणि 6/128 जीबी 27,999 ठेवण्यात आली आहे. दोन्ही फोनमध्ये 6.39 इंचाचा हॉरिझॉन अमोल्ड डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरही आहे. 6 / 9K20 Pro चा प्रोसेसर 5जी ला सपोर्ट करणारा स्नॅपड्रॅगन 855 हा देण्यात आलेला आहे. दोन्ही फोनमध्ये 4000 एमएएचची बॅटरी आहे. 7 / 9रेडमीने स्पेशल एडिशन म्हणून 4.8 लाखांचा फोनही लाँच केला असून याचे केवळ 20 फोनच विकले जाणार आहे. या फोनमध्ये सोन्याची बॉडी आहे. 8 / 9रेडमीने स्पेशल एडिशन म्हणून 4.8 लाखांचा फोनही लाँच केला असून याचे केवळ 20 फोनच विकले जाणार आहे. या फोनमध्ये सोन्याची बॉडी आहे. 9 / 948 मेगापिक्सलच्या कॅमेरातून काढलेला फोटो