By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 18:52 IST
1 / 4OnePlus ने गेल्याच आठवड्यात भारतात OnePlus 6T हा प्रिमिअम श्रेणीतील मोबाईल लाँच केला आहे. मात्र, हा मोबाईल केवळ दोनच रंगात लाँच करण्यात आले होते. मात्र, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी OnePlus 6T छानशा जांभळ्या रंगातही भारतात लवकरच लाँच केला जाणार आहे. 2 / 4OnePlus 6T हा मोबाईल 6 जीबी आणि 8 जीबी रॅम अशा दोन व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. तसेच 128 जीबी आणि 256 जीबी स्टोरेजमध्येही पर्याय उपलब्ध आहे. अफलातून कॅमेरा 40 हजाराच्या किंमतीमध्ये उपलब्ध झाला आहे. हा फोन ई-कॉमर्स साइट अमेजन इंडिया, OnePlus स्टोर, क्रोमा, रिलायंस डिजिटल मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे, 3 / 4या OnePlus 6T मध्ये आता आकर्षक अशा नव्या रंगाची भर पडणार आहे. थंडर पर्पल म्हणजेच जांभळ्या रंगाच्या शेडमध्ये हा फोन येत्या 16 नोव्हेंबरला फ्लॅश सेलमध्ये उपलब्ध होणार आहे. अॅमेझॉनसह अन्य ठिकाणी हा फोन लिमिटेड स्टॉकमध्ये विकला जाणार आहे. यामुळे या नव्या रंगातील फोनसाठी मोबाईलप्रेमींची पसंती राहणार असली तरीही OnePlus 6T हा फोन मिरर ब्लॅक आणि ब्लॅक या रंगांमध्ये लाँच झाल्यानंतर लगेचच घेतलेल्या ग्राहकांचा हिरमोड होणार आहे. 4 / 4OnePlus 6T च्या या व्हेरिअंटची किंमत 41,999 असणार आहे. लाँच ऑफर्समध्ये एचडीएफसी बँकेच्या कार्डद्वारे 1500 रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. तसेच जियो वापरणाऱ्यांना 5400 रुपयांचे कॅशबॅक व्हाऊचर मिळणार आहे. याचसोबत Kotak Servify कडून 12 महिन्यांचे फ्री डेमेज प्रोटेक्शन मोफत मिळणार आहे.