शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

फक्त चार्जिंगसाठी नाही, तुमच्या स्मार्टफोनमधील Type-C पोर्टचे भन्नाट उपयोग; जाणून घ्या ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 16:00 IST

1 / 5
आजकाल बहुतांश स्मार्टफोन, टॅब्लेट आणि इतर स्मार्ट गॅजेट्समध्ये Type-C पोर्ट दिला जातो. मात्र, बहुतांश युजर्स या पोर्टचा उपयोग केवळ फोन चार्ज करण्यापुरताच मर्यादित ठेवतात. प्रत्यक्षात हा पोर्ट चार्जिंगशिवायही अनेक कामांसाठी वापरता येतो, ज्याची माहिती अनेकांना नसते. Type-C पोर्टमुळे तुमचा स्मार्टफोन अधिक स्मार्ट बनतो. जाणून घेऊया या पोर्टचे काही महत्त्वाचे फायदे आणि उपयोग.
2 / 5
आजचे अनेक स्मार्टफोन रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट करतात. याचा अर्थ, Type-C पोर्टच्या मदतीने तुमचा फोन इतर डिव्हाइसेस चार्ज करू शकतो. Type-C टू Type-C केबल वापरून तुम्ही इअरबड्स, स्मार्टवॉच, फिटनेस बँड यांसारखी उपकरणे सहज चार्ज करू शकता. गरज पडल्यास तुमचा फोनच पॉवर बँकचे काम करतो.
3 / 5
क्विकशेअर किंवा एअरड्रॉपसारख्या वायरलेस पर्यायांनी डेटा शेअर करणे सोपे असले, तरी मोठ्या फाइल्स ट्रान्सफर करताना वेळ लागतो. अशा वेळी Type-C टू Type-C केबल वापरून दोन फोन थेट कनेक्ट केल्यास मोठ्या फाइल्स अतिशय वेगाने ट्रान्सफर करता येतात.
4 / 5
Type-C पोर्टच्या मदतीने स्मार्टफोनला मिनी कॉम्प्युटरमध्येही रूपांतरित करता येते. या पोर्टमध्ये ब्लूटूथ डोंगल लावून वायरलेस कीबोर्ड आणि माऊस कनेक्ट करता येतात. विशेषतः फोनची टचस्क्रीन खराब झाली असेल, तरीही हा पर्याय अतिशय उपयुक्त ठरतो.
5 / 5
फोनच्या छोट्या स्क्रीनवर सतत व्हिडिओ किंवा वेब सीरिज पाहून कंटाळा आला असेल, तर Type-C पोर्ट उपयोगी पडतो. अनेक स्मार्टफोन Type-C व्हिडिओ आउटपुट सपोर्ट करतात. HDMI टू Type-C केबल वापरून फोन थेट टीव्हीला जोडता येतो. यामुळे फोनवरील व्हिडिओ, चित्रपट किंवा प्रेझेंटेशन मोठ्या स्क्रीनवर पाहता येतात.
टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान