फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 15:28 IST
1 / 7आजकाल जुना स्मार्टफोन विकणे किंवा कोणाला तरी देणे ही एक सामान्य गोष्ट बनली आहे. पण, असे करताना सर्वात मोठी चिंता आपल्या वैयक्तिक डेटाच्या सुरक्षिततेची असते. अनेकदा लोक घाईघाईत फोन विकतात, पण डेटा योग्य प्रकारे डिलीट करायला विसरतात. तुमच्या जुन्या डिव्हाइसमध्ये बँकिंग तपशील, ईमेल आयडी, पासवर्ड, चॅट हिस्ट्री आणि फोटोसारखी संवेदनशील माहिती असते. ही माहिती चुकीच्या व्यक्तीच्या हाती लागल्यास चोरीपासून ते आर्थिक नुकसानीपर्यंतचे धोके निर्माण होऊ शकतात.2 / 7बरेच लोक असा विचार करतात की, फोनमधून फाइल्स डिलीट करणे किंवा फॅक्टरी रिसेट केल्याने सर्व डेटा पूर्णपणे डिलीट होतो. पण, सत्य यापेक्षा वेगळे आहे. अनेकदा डिलीट केलेला डेटा खास रिकव्हरी सॉफ्टवेअरच्या मदतीने परत मिळवता येतो. त्यामुळे, केवळ रिसेट करणे पुरेसे नाही, तर डेटा पूर्णपणे मिटवण्यासाठी काही अतिरिक्त उपाय करणे आवश्यक आहे.3 / 7जुना स्मार्टफोन विकण्याआधी सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या सर्व महत्त्वाच्या फाइल्स आणि फोटोंचा बॅकअप घेणे. यासाठी तुम्ही क्लाउड स्टोरेज किंवा हार्ड ड्राइव्हचा वापर करू शकता. बॅकअप पूर्ण झाल्यानंतर, तुमच्या फोनमधून आणि रिसायकल बिनमध्ये कोणतीही महत्त्वाची फाईल राहिली नाही ना, याची खात्री करा.4 / 7बॅकअप घेतल्यानंतर, तुमच्या फोनशी लिंक असलेले तुमचे सर्व Google अकाउंट्स, सोशल मीडिया अकाउंट्स आणि बँकिंग ॲप्समधून लॉगआउट करणे आवश्यक आहे. यामुळे तुमची माहिती त्या डिव्हाइसमध्ये राहणार नाही आणि नवीन मालकालाही फोन वापरण्यात कोणतीही अडचण येणार नाही.5 / 7जर तुमचा फोन अँड्रॉइड लॉलीपॉप (५.०) किंवा त्यापुढील व्हर्जनचा असेल, तर त्यात फॅक्टरी रिसेट प्रोटेक्शन हे फीचर असते. हे फीचर डिसेबल करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण याशिवाय नवीन युजर फोन वापरू शकणार नाही. हे डिसेबल करण्यासाठी 'सेटिंग्ज'मध्ये जाऊन तुमचे गुगल अकाउंट काढून टाका.6 / 7फॅक्टरी रिसेट करण्यापूर्वी ही एक सोपी पण प्रभावी ट्रिक नक्की वापरा. तुमच्या फोनची स्टोरेज मोठी साईजच्या डमी किंवा जंक डेटाने भरा, जसे की मोठे व्हिडीओ, गाणी किंवा चित्रपट. जेव्हा तुम्ही यानंतर फोन रिसेट कराल, तेव्हा हा नवा डेटा जुन्या फाईल्सवर ओव्हरराईट होईल. यामुळे जर कोणी डेटा रिकव्हर करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला फक्त निरुपयोगी फाइल्स मिळतील, तुमची खासगी माहिती नाही.7 / 7हे सर्व झाल्यावर तुम्ही फोन फॅक्टरी रिसेट करू शकता. प्रत्येक कंपनीच्या फोनमध्ये रिसेट करण्याची पद्धत थोडी वेगळी असते, पण सहसा 'सेटिंग्ज'मधून हे सहज करता येते. रिसेट केल्यानंतर, तुमच्या गुगल अकाउंटच्या डिव्हाइस यादीमधून जुना फोन काढून टाकायला विसरू नका. यामुळे तुमचा डेटा पूर्णपणे सुरक्षित राहील. हे सर्व उपाय केल्यावरच तुम्ही निश्चिंत होऊन तुमचा जुना फोन विकू शकता आणि डेटा चोरीच्या चिंतेतून मुक्त होऊ शकता.