शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

15 ऑगस्टला जिओची 5G सेवा लाँच होईल, स्वातंत्र्याचा उत्सव द्विगुणित होणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 20:50 IST

1 / 7
नवी दिल्ली : बऱ्याच दिवसांपासून भारतात 5G सेवा सुरू करण्याबाबत चर्चा सुरु होती. दरम्यान, भारतातील सर्वात लोकप्रिय नेटवर्क अर्थात जिओने आता आपली 5G सेवा बाजारात आणण्‍याची घोषणा केली आहे.
2 / 7
विशेष बाब म्हणजे, ज्या दिवशी ही सेवा बाजारात आणली जात आहे, तो दिवस संपूर्ण भारतासाठी खूप खास आहे आणि या दिवशी 5G सेवा लाँच करून कंपनी भारतीय ग्राहकांना एक खास संदेशही देऊ इच्छित आहे.
3 / 7
जिओ येत्या 15 ऑगस्टला म्हणजेच स्वातंत्र्यदिनी भारतात 5G सेवा लाँच होणार आहे, हा दिवस भारतीयांसाठी खूप खास आहे. यावर्षी आपला देश 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. हा उत्सव द्विगुणित करण्यासाठी जिओ कंपनी भारतीय ग्राहकांसाठी 5G सेवा सुरू करणार आहे.
4 / 7
दरम्यान, ही सेवा 5G स्मार्टफोन वापरणाऱ्या ग्राहकांना पुढील स्तराचा अनुभव देईल, मग तो इंटरनेट स्पीड असो किंवा कॉलिंग, दोन्हीही पूर्वीपेक्षा चांगले असतील आणि ग्राहकांना असा अनुभव मिळेल, जो त्यांना यापूर्वी कधीही मिळाला नव्हता.
5 / 7
अलीकडेच, एअरटेलने ऑगस्टच्या अखेरीस 5G सेवा सुरू करण्याबाबत भाष्य केले आहे. अशा परिस्थितीत एअरटेलनेही जिओला टक्कर देण्याची तयारी पूर्ण केली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला, रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे अध्यक्ष आकाश अंबानी म्हणाले होते की, ते संपूर्ण भारत 5G रोलआउटसह 'आझादी का अमृत महोत्सव' साजरा करेल.
6 / 7
5G सेवा सुरू होण्यासोबत ग्राहकांना कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुपरफास्ट इंटरनेट स्पीड पाहण्यास मिळेल, जो पूर्वीपेक्षा खूपच चांगले असणार आहे. त्यामुळे शिक्षण, कृषी, आरोग्य या मोठ्या क्षेत्रांना मोठा फायदा होणार आहे. दरम्यान, पूर्वी कॉल करताना तुम्हाला ज्या समस्यांचा सामना करावा लागत होता, त्या आता पूर्वीसारख्या होणार नाहीत.
7 / 7
खरंतर, 5G सेवेसह सर्व प्रकारच्या कॉलिंग समस्या दूर होतील आणि युजर्स एक उत्तम अनुभव मिळेल. आपत्कालीन प्रतिसादापासून ते पुढील स्तरावरील गेमिंग आणि मनोरंजनापर्यंत या सेवेसह शक्यता अमर्याद आहेत.
टॅग्स :JioजिओReliance Jioरिलायन्स जिओ