Neal Mohan: गुगलकडून YouTube ची जबाबदारी भारतीयाच्या खांद्यावर! नवे सीईओ नील मोहन कोण आहेत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 12:12 IST
1 / 9You Tube CEO: भारतीय वंशाचे 49 वर्षीय नील मोहन यांना तंत्रज्ञानाची चांगली जाण आहे. बिझनेस स्ट्रॅटेजी बनवण्यात ते तज्ञ आहेत. त्यांच्या आतापर्यंतच्या कार्यकाळात त्यांनी युट्युबच्या धोरणात मोलाचे योगदान दिले आहे. नील त्यांच्या कुटुंबासह सॅन फ्रान्सिस्कोमध्ये राहतात.2 / 9You Tube CEO: आज जगभरात भारतीय वंशाचे सीईओ आहेत. यात जगातील सर्वात मोठी सर्च साईट असणाऱ्या गुगलमध्येही भारतीय सुंदर पिचाई सीईओ आहेत. आता गुगने युट्युबची कमानही भारतीयाच्या खांद्यावर दिली आहे.3 / 9You Tube CEO: यूट्यूब सारख्या लोकप्रिय स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मचे सीईओ देखील भारतीय वंशाचे नील मोहन झाले आहेत. भारतीय-अमेरिकन नागरिक नील मोहन हे YouTube चे पुढील मुख्य कार्यकारी अधिकारी असतील.4 / 9नील मोहन सुसान वोजिकीची जागा घेणार आहेत. सुसान वोजिकी यांनी वैयक्तिक कारणांमुळे YouTube च्या सीईओ पदाचा राजीनामा दिला आहे. ट्विटरवरील YouTube ने वोजिकीच्या राजीनाम्याची माहिती दिली.5 / 9नील मोहन सध्या YouTube वर उत्पादन अधिकारी आहेत. ते सुसान वोजिकीचा दीर्घकाळ सहयोगी आहेत. नील मोहन यांनी 1996 मध्ये स्टॅनफोर्ड विद्यापीठातून इलेक्ट्रिक इंजिनीअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली. यानंतर, 2005 मध्ये त्यांनी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीए पूर्ण केले. 6 / 9नील मोहन 2008 मध्ये गुगलमध्ये रुजू झाले. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. ते यशाचे शिखर गाठतच राहिले आहेत.7 / 9YouTube मध्ये जॉईन होण्यापूर्वी, नील हे Google वर वरिष्ठ उपाध्यक्ष, डिस्प्ले आणि व्हिडीओ जाहिरातचे होते. 2015 मध्ये, नीला यूट्यूबचे मुख्य निर्मिती अधिकारी बनले. नीलने त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला मायक्रोसॉफ्टमध्ये इंटर्नशिप केली. YouTuber चे मुख्य उत्पादन अधिकारी म्हणून काम करताना, त्यांनी शॉर्ट्स, संगीत आणि सदस्यतांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले.8 / 9नील मोहन बिझनेस स्ट्रॅटेजी बनवण्यात तज्ञ आहेत. त्यांच्या आतापर्यंतच्या कार्यकाळात त्यांनी युट्युबच्या धोरणात मोलाचे योगदान दिले आहे.9 / 9 नील सध्या त्यांच्या कुटुंबासह सॅन फ्रान्सिस्कोमध्ये राहतात. नील यांना अनेक मोठ्या कंपन्यांनी ऑफर दिली पण त्यांनी यूट्यूब सोडलेले नाही.