शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 21:44 IST

1 / 5
आयफोन खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट आणि अमेझॉनने आयफोन १६ च्या किंमतीत मोठी कपात केली आहे.
2 / 5
लवकरच आयफोन १७ बाजारात दाखल होणार आहे. दरवर्षी सप्टेंबर महिन्यात आयफोनची पुढील आवृत्ती लॉन्च करते. त्यामुळे आयफोन १७ सप्टेंबर महिन्यात लॉन्च होईल, अशी अपेक्षा आहे.
3 / 5
फ्लिपकार्टच्या फ्रीडम सेलमध्ये आयफोन १६ (१२८ जीबी) ७९,९०० रुपयांवरून ६९,९९९ रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. तर, अॅमेझॉन ग्रेट फ्रीडम सेलमध्ये हा फोन ७१,९०० रुपयांना उपलब्ध आहे.
4 / 5
फ्लिपकार्ट सेलमध्ये आयफोन १६ प्रोवर १२,००० रुपयांचं डिस्काउंट दिले जात असून हा फोन १ लाख ०७ हजार ९०० रुपयांना विकला जात आहे. हा फोन १ लाख १९ हजार ९०० रुपयांना लॉन्च करण्यात आला. तर, अॅमेझॉनवर हा फोन अमेझॉनवर १ लाख ११ हजार ९०० रुपयांना विकला जात आहे.
5 / 5
अ‍ॅक्सिस बँक, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँकेच्या कार्डवर अतिरिक्त चार हजार रुपयांचा कॅशबॅक मिळत आहे. त्यामुळे हा फोन ग्राहकांना ६३ हजार ४९९ रुपयांत मिळू शकतो.
टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानApple Incअॅपल