आता Google ची 'ही' सेवा बंद होणार, तुम्हीही वापरता का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 14:07 IST
1 / 7अमेरिकन टेक कंपनी गुगल (Google) आपली एक सेवा बंद करणार आहे. 18 जानेवारी 2023 नंतर Google Stadia Cloud बंद होईल. दरम्यान, ही सेवा ऑक्टोबर 2018 मध्ये बीटा व्हर्जनमध्ये लॉन्च करण्यात आली होती. 2 / 7नोव्हेंबर 2019 पर्यंत Google Stadia Cloud सेवा सर्वांना उपलब्ध करून देण्यात आला होती. मात्र, गुगलचा हा प्लॅन अपयशी ठरला आणि कंपनीने आता ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. द व्हर्जच्या रिपोर्टनुसार, अनेक पब्लिशनने इतर प्लॅटफॉर्मवर गेम कसा शेअर करायचा हे सांगितले आहे. 3 / 7Google Stadia वर सेव्ह गेम्स आणि टायटल्सला युजर्स गमावणार आहेत. एका रिपोर्टनुसार, अमेरिकन टेक्नॉलॉजी कंपनी Google Store वरून खरेदी केलेल्या Stadia हार्डवेअरवर रिफंड देत आहे. 4 / 7याशिवाय, कंपनी Stadia Store मधून खरेदी केलेल्या अॅड-ऑन खरेदी आणि गेमचा रिफंडही देत आहे. रिपोर्टनुसार, कंपनीने रिफंड जारी केला आहे आणि बहुतेकांना 18 जानेवारी 2023 पर्यंत रिफंड मिळेल. दरम्यान, याचा सामान्य युजर्सवर परिणाम होणार नाही. यामुळे युजर्सना घाबरण्याची गरज नाही.5 / 7आणखी एका बातमीनुसार, Google आता वेब ब्राउझरच्या Gmail मध्ये एंड-टू-एंड एन्क्रिप्शन आणणार आहे. हे सध्या बीटा युजर्ससाठी जारी करण्यात आले आहे. यासह युजर्स एनक्रिप्टेड ईमेल सेंड आणि रिसिव्ह करू शकतील. 6 / 7Google च्या मते, ईमेल आणि अटॅचमेंट्स इनलाइन इमेजसह एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असणार आहे. अशा प्रकारची सिक्योरिटी सध्या व्हॉट्सअॅप, सिग्नल आणि इतर इन्स्टंट मेसेजिंग अॅप्समध्ये उपलब्ध आहे. 7 / 7पण, येत्या काळात ही सिक्योरिटी Gmail मध्येही पाहायला मिळणार आहे. मात्र, यासाठी युजर्सना काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.