थिएटरचा अनुभव घरच्या घरी; स्वस्तात विकत घ्या 43 इंचाचे हे स्मार्ट टीव्ही, Flipkart देतंय भारी डिस्काउंट
By सिद्धेश जाधव | Updated: January 3, 2022 19:26 IST
1 / 7Flipkart TV Days Sale 2022 सेल 1 जानेवारी ते 5 जानेवारी 2022 या दरम्यान सुरु राहणार आहे. सेलमध्ये 43 इंचाचे स्मार्ट टीव्ही स्वस्तात विकत घेता येतील. 2 / 7सेलमध्ये Blaupunkt, Xioaomi, Samsung, Realme आणि OnePlus कंपनीचे स्मार्ट टीव्ही नो-कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज ऑफर अंतर्गत विकत घेता येतील. जुना टीव्ही एक्सचेंज करून 11,000 रुपयांची बचत करता येईल. 3 / 7हा स्मार्ट टीव्ही 27,999 रुपयांमध्ये सादर करण्यात आला आहे. हा एक 4K अँड्रॉइड स्मार्ट टीव्ही जो HDR10+ शार्ट व्हिज्युअल्स आणि विविड कलर्सला सपोर्ट करतो. यात Google Play Store आणि गुगल असिस्टंट मिळतो. कंपनीनं यात एक 50W आउटपुट स्पीकर दिला आहे. 4 / 7Mi TV 4X स्मार्ट टीव्ही 4K Ultra HD डिस्प्लेसह सादर करण्यात आली आहे. ज्याची किंमत 29,999 रुपये आहे, यात 60Hz रिफ्रेस्ड रेट मिळतो. हा अँड्रॉइड टीव्ही 9.0 आधारित आहे. यात Netflix, Prime Video आणि Disney+ Hotstar असे अॅप्स इनबिल्ट मिळतात. 5 / 7Realme चा हा 43 इंचाचा स्मार्ट टीव्ही फुल एचडी सपोर्टसह बाजारात आला आहे. 29,999 रुपयांचा हा स्मार्ट टीव्ही 24 वॉट आउटपुट असलेल्या क्वॉड कोर स्पिकरसह बाजारात आला आहे. हे स्पीकर Dolby Audio ला सपोर्ट करतात. 6 / 7OnePlus TV 43Y1 ची किंमत 26,999 रुपये आहे. या टीव्ही मध्ये 2 HDMI, 2 USB पोर्ट सह Wi-Fi 2.4 GHz आणि ब्लूटूथ 5.0 कनेक्टिविटी मिळते. तसेच यात 20W चे दोन स्पिकर देण्यात आले आहेत. 7 / 7SAMSUNG च्या या स्मार्ट टीव्हीची किंमत 36,999 रुपये आहे. जो एक अल्ट्रा एचडी 4K स्मार्ट टीव्ही आहे. हा स्मार्ट टीव्ही 60Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.