1 / 10लोकप्रिय टेक्नॉलॉजी कंपनी असुस (Asus) ने कॉम्पुटेक्ट 2019 कॉन्फरन्समध्ये अनेक नवीन प्रोडक्ट्स लाँच केले आहेत. यामध्ये कंपनीने लाँच केलल्या ड्यूल स्क्रीनवाल्या लॅपटॉपची सर्वाधिक चर्चा आहे.2 / 10Asus ZenBook Pro Duo असं या लॅपटॉपचं नाव असून तो जगातील पहिला दोन स्क्रीन असलेला लॅपटॉप आहे.3 / 10ZenBook Pro Duo मध्ये देण्यात आलेली दुसरी स्क्रीन कीबोर्डसोबतच्या एरियामध्ये देण्यात आली आहे. 4 / 10कीबोर्डच्या अगदी वरच्या बाजूला ही स्क्रीन देण्यात आली आहे.5 / 10दोन स्क्रीन असलेल्या या लॅपटॉपमध्ये 15.6 इंचाची 4K UHD OLED HDR सपोर्टिंग टच स्क्रीन देण्यात आली आहे. युजर्स कोणतीही विंडो दुसऱ्या स्क्रीनवर ड्रॅग करू शकतात.6 / 10मेन स्क्रीनमध्ये असुसने नॅनो एज डिजाईनचा वापर केला आहे. जेणेकरून डिस्प्लेला चारही बाजूने थिन बेजल्स देण्यात आले आहेत. 7 / 10लॅपटॉपमध्ये नंबर पॅड डायल फंक्शन देखील देण्यात आले आहे. 8 / 10कीबोर्डमध्ये आरामात टायपिंग करता यावं म्हणून पाम रेस्ट देण्यात आलं आहे. 9 / 10लॅपटॉपमध्ये 9th जनरेशन इंटेल कोर i7 (9750H) किंवा i9 (9980HK) प्रोसेसर देण्यात येणार असून 32GB DDR4 रॅम दिली जाणार आहे. 10 / 10लॅपटॉपमध्ये कोणताही एसडी कार्ड सपोर्ट देण्यात आलेला नाही. 2.5 किलोग्रॅम वजनाचा हा लॅपटॉप आहे. भारतात हा दोन स्क्रीन असलेला लॅपटॉप कधी लाँच करण्यात येणार याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.