शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Bumble: वाह! कोरोनामुळे कर्मचाऱ्यांना स्ट्रेस; ‘या’ कंपनीने दिली ७०० जणांना भरपगारी सुट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2021 18:58 IST

1 / 10
कोरोना संकटामुळे नोकरदार वर्गाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर अनेकांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार असल्याचे सांगितले जात आहे.
2 / 10
त्यातच या कालावधीत अनेक कर्मचाऱ्यांना मानसिक ताण आल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना गमावण्याची भीती कंपन्यांना असल्याचे म्हटले जात आहे. यावर कंपन्या आपापल्या परिने काही ना काही उपाय करताना दिसत आहे.
3 / 10
डेटिंग आणि रिलेशनशिप अ‍ॅप बंबल कंपनीने कर्मचार्‍यांच्या हितासाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता आठवडाभरासाठी कंपनीचे कार्यालय बंद ठेवण्यात येणार आहे.
4 / 10
कोरोनामुळे कंपनीतील अनेक कर्मचाऱ्यांवर ताण येत असल्याचे लक्षात येताच एकूण ७०० कर्मचार्‍यांना भरपगारी रजेवर पाठवण्यात आले आहे. मानसिक ताणावर मात करून कर्मचाऱ्यांना दिलासा मिळावा याकरिता असा निर्णय घेण्यात आला आहे.
5 / 10
अनेक देशांमध्ये कोरोनाची परिस्थिती बहुतांश प्रमाणात नियंत्रणात येत असल्याचे निर्बंध हटवण्यात आले आहेत. तसेच कंपन्या, उद्योग, व्यवसाय पुन्हा सुरू होताना दिसत आहेत.
6 / 10
मायक्रोसॉफ्टनुसार, या वर्षी एकूण ४१ टक्के लोक बाहेर पडू शकतात. अशा परिस्थितीत बर्‍याच कंपन्यांना आपले कर्मचारी गमावण्याची भीती असते. त्यांची मनोवृत्ती कधीही बदलू शकते. काही कंपन्या आपल्या कर्मचार्‍यांना आराम देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
7 / 10
सिटी ग्रुप इंक यांनी मार्च मध्येच जाहीर केले होते की ते झूम कॉलवर बंदी घालणार आहे. त्याचबरोबर काही कंपन्यांनी कर्मचार्‍यांकरिता अधिक वेतन आणि जेवणाची देखील व्यवस्था केली आहे.
8 / 10
गोल्डमन सॅक्स ग्रुप इंक आणि जेपी मॉर्गन चेस अँड कॉ. सारख्या कंपन्यांनी लस घेतलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये परत बोलावण्यास सुरवात केली आहे.
9 / 10
Apple इंक एक हायब्रीड वर्क फ्रॉम होम रणनीती स्विकारण्याच्या तयारीत आहे. तर, कर्मचारी अनिश्चित काळासाठी घरूनच काम करू शकतील असे ट्विटरतर्फे सांगण्यात आले आहे.
10 / 10
बंबल हे एक डेटिंग अॅप असून, प्रियंका चोप्रा ही यातील एक गुंतवणूकदार असल्याचे सांगितले जात आहे. सुमारे २ वर्षांपूर्वी हे अॅप भारतात लॉन्च करण्यात आले होते.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याITमाहिती तंत्रज्ञान