BSNL ची भन्नाट ऑफर; फक्त 151 रुपयांत मिळेल 25 OTT आणि 450 पेक्षा जास्त Live चॅनेल्स...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 17:10 IST
1 / 6 BSNL : आजकल टेलिकॉम कंपन्या फक्त कॉलिंग आणि डेटाच देत नाही, तर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मनोरंजनाची सुविधाही करतात. अनेक कंपन्या आपल्या रिचार्ज पॅक्ससोबत OTT प्लॅटफॉर्म्सचे मोफत सब्सक्रिप्शन देतात. 2 / 6यामध्ये आता BSNL चे नावही जोडले गेले आहे. कंपनीने एक BiTV Premium Pack लॉन्च केला आहे. या पॅकमध्ये युजरला एकाच अॅपमध्ये अनेक OTT प्लॅटफॉर्म्स आणि लाईव्ह चॅनेल्स पाहता येणार आहेत.3 / 6BSNL ने आपल्या BiTV सर्व्हिसची सुरुवात फेब्रुवारी 2025 मध्ये केली होती. तेव्हा ही सुविधा मोफत उपलब्ध होती. मात्र, आता कंपनीने याला एक पेड सब्सक्रिप्शन पॅकच्या स्वरुपात आणले आहे. 4 / 6या नवीन प्रीमियम पॅकमध्ये युजरला 25 पेक्षा जास्त OTT प्लॅटफॉर्म्सचा अॅक्सेस आणि 450 पेक्षा जास्त लाईव्ह टीव्ही चॅनेल्स पाहता येतील. 5 / 6कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, Premium Pack फक्त 151 रुपयांना मिळेल. याच्या वैधतेबाबत कुठलीही माहिती कंपनीने दिलेली नाही. 6 / 6या पॅकमध्ये युजरला ZEE5, SonyLIV, Aha, Shemaroo, Sun Nxt Chaupal, Lionsgate, ETV Win, Discovery, Epic ON सारखे लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म्सचा अॅक्सेस मिळतो.