BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 08:46 IST
1 / 8बरीच वाट पहायला लावल्यानंतर सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने (BSNL) अखेर आपली ४जी सेवा देशभरात सुरू केली आहे. २७ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या फोरजी सेवेचे लोकार्पण करण्यात आले. हे तंत्रज्ञान ९७,५०० टॉवर्सच्या मदतीने उभारण्यात आले आहे. तसेच ते कधीही ५जी करता येणार आहे. म्हणजे बीएसएनएलला पुन्हा त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार नाहीत. आज आम्ही पुण्यात बीएसएनएल फोरजी सेवेचा वेग तपासून पाहिला. 2 / 8हा स्पीडचा आकडा तुम्ही पहाल तर तशी काहीच सुधारणा झालेली नाही असेच म्हणाल. अर्थात तुमच्या गावात, शहरात, तालुक्याच्या ठिकाणी वेगवेगळा स्पीड तुम्हाला येईल. तो कसा तपासायचा ते देखील आम्ही तुम्हाला सांगू. परंतू, आम्हाला महाराष्ट्राच्या आयटी नगरीत जसा स्पीड हवा तसा तर दिसलाच नाही. मुंबईत तर एमटीएनएल असल्याने तिथेही फारशी अपेक्षा नाही. आता गावखेड्यांत जर बीएसएनएलने जिओला मागे टाकले तरच काहीतरी त्या फोरजीचा फायदा होईल असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 3 / 8पुण्यातील सिंहगड भागात आम्ही बीएसएनएलच्या फोरजी नेटवर्कवर स्पीड तपासला. आम्ही जो फोन वापरला तो ओप्पो रेनो १० प्रो प्लस हा फाईव्ह जी फोन होता. हा फोन आम्ही काचेच्या इमारतीत आणि इमारतीबाहेरही नेला व इंटरनेटचा स्पीड तपासला.4 / 8 इमारतीत हा स्पीड ५.८७ एमबीपीएस डाऊनलोड आणि १.८० एमबीपीएस अपलोड असा होता. मध्येच हा स्पीड १० एमबीपीएसपर्यंत जायचा.5 / 8बाहेरच्या बाजुला म्हणजेच मोकळ्या वातावरणात हा स्पीड थोडासा वाढला. ७.८३ एमबीपीएस डाऊनलोड आणि १.४१ अपलोड असा होता. हा स्पीड जिओच्या किंवा व्होडाफोन, एअरटेलच्या फोरजीलाही मागे टाकू शकत नाही. 6 / 8डाऊन डिटेक्टरवर तर सध्या भारतात डाऊन असलेल्या दोनच सेवा आहेत. त्यात बीएसएनएल आणि आयआरसीटीसी. फोरजीनंतर तरी बीएसएनएलची सेवा सुधारेल अशी अपेक्षा होती. परंतू, ती देखील फोल ठरताना दिसत आहे. 7 / 8डाउनलोड स्पीड ६-७ एमबीपीएसवरच घुटमळत आहे. तर अपलोड स्पीड एवढा खाली आहे की जुने टुजी कनेक्शन त्यापेक्षा भारी होते असे म्हणायची वेळ आहे. ओकलाच्या स्पीड टेस्ट अॅपनुसार आम्ही या नेटवर्कवर फक्त सर्फिंग करू शकतो, व्हिडीओ पहायचे असतील किंवा गेमिंग करायचे असेल तर त्यासाठी झगडत रहावे लागणार आहे. 8 / 8तुम्हालाही तुमच्या भागातील बीएसएएनएल किंवा अन्य कोणत्याही नेटवर्कचा स्पीड टेस्ट करायचा असेल तर गुगलवर फास्ट.कॉम असे सर्च करा किंवा ओकलाचे स्पीड टेस्ट हे अॅप डाऊनलोड करा. त्यावर तुम्हाला स्पीड समजणार आहे.