शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 19:23 IST

1 / 6
Apple ने या आठवड्यात आपला बहुचर्चित iPhone 17, iPhone Air, iPhone 17 Pro आणि iPhone 17 Pro Max लॉन्च केले आहेत. तसेच, कंपनीने Watch Series 11, Watch Ultra 3, Watch SE 3 आणि AirPods Pro 3 देखील लॉन्च केले आहेत.
2 / 6
आयफोन 17 सीरिजमधील सर्व फोनसाठी प्री-ऑर्डर आज, म्हणजेच 12 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. तर, थेट विक्री पुढील आठवड्यात सुरू होईल. तुम्ही आज संध्याकाळी 5.30 वाजल्यापासून हे स्मार्टफोन प्री-ऑर्डर करू शकता. याची विक्री 19 सप्टेंबरपासून सुरू होईल.
3 / 6
तुम्ही Amazon, Flipkart, Blinkit, Apple Store आणि कंपनीच्या अधिकृत रिटेल भागीदारांकडून iPhone 17 सीरिज आणि इतर उत्पादने खरेदी करू शकता. हा फोन Croma आणि Vijay Sales वर प्री-ऑर्डरसाठी देखील उपलब्ध आहे.
4 / 6
कंपनीने iPhone 17 ची सुरुवातीची किंमत 82,900 रुपये ठेवली आहे. ही किंमत फोनच्या 256GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी आहे. तर, आयफोन एअरची किंमत १,१९,९०० रुपयांपासून सुरू होते. प्रो सिरीजबद्दल बोलायचे झाले तर, आयफोन 17 प्रोच्या बेस व्हेरिएंटसाठी 1,34,9000 रुपये आहे.
5 / 6
आयफोन 17 प्रो मॅक्सचा बेस व्हेरिएंट 1,49,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आला आहे. सर्व स्मार्टफोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये तुम्हाला 256 जीबी स्टोरेज मिळेल. तुम्ही हे सर्व डिव्हाइस अ‍ॅपल स्टोअरवरून 6 महिन्यांच्या नो-कॉस्ट ईएमआय आणि 5000 रुपयांच्या सवलतीत खरेदी करू शकता. ही सवलत निवडक बँक कार्डवर उपलब्ध आहे.
6 / 6
तुम्ही या स्मार्टफोन्सवर अ‍ॅपलच्या ट्रेड-इन ऑफरचा लाभ देखील घेऊ शकता. तर, आयफोन १७ सिरीज फ्लिपकार्ट आणि अमेझॉनवर कमिंग सून या टॅगसह सूचीबद्ध आहे. फ्लिपकार्टवर, फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक आणि फ्लिपकार्ट एसबीआय क्रेडिट कार्ड वापरल्यास 4000 रुपयांचा कॅशबॅक उपलब्ध असेल.
टॅग्स :Apple IncअॅपलApple's Mega Launch Eventअ‍ॅपल मेगा लाँचSmartphoneस्मार्टफोन