शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

6GB रॅम असलेल्या मेड इन इंडिया फोनवर तगडा डिस्काउंट, आताच करा बूक...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 3:00 PM

1 / 9
आज म्हणजेच 16 डिसेंबरपासून Flipkart Big Saving Days Sale सुरू झाला आहे. 16 डिसेंबरपासून सुरू झालेला Flipkart Sale 21 डिसेंबरपर्यंत लाइव्ह असेल. या सेलदरम्यान ग्राहकांना विविध वस्तुंवर मोठी सूट आणि विविध ऑफर मिळणार आहेत.
2 / 9
या सेलमध्ये विविध कंपनीच्या स्मार्टफोन्सवर मोठा डिस्काउंट मिळत आहे. पण, आज आम्ही तुम्हाला 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीचा आणि 6जीबी रॅम असलेल्या मोबाईलबद्दल सांगणार आहोत.
3 / 9
Flipkart Sale मध्ये भारतीय मोबाईल कंपनी Micromax च्या Budget Smartphone मध्ये मोठी सूट मिळत आहे. Micromax In 2B या स्मार्टफोनला डिस्काउंटसह विकले जात आहे. Micromax IN 2B वर किती रुपयांची सूट आहे, हे जाणून घेऊच. पण, तत्पुर्वी या फोनबद्दल सर्व माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत.
4 / 9
फोनमध्ये दमदार ऑक्टा-कोर यूनिसॉक T-610 प्रोसेसर असून, हा फोन 4 आणि 6 जीबी रॅममध्ये उपलब्ध आहे. तसेच, दोन्ही व्हेरिएंटमध्ये 64 जीबी इंटरनल स्टोरेज असून, मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने हे स्टोरेज 256 जीबीपर्यंत वाढवता येते.
5 / 9
या फोनच्या रिअरला डुअल रिअर कॅमरा सेटअप आहे. एक 13 मेगापिक्सल प्रायमरी कॅमरा आणि 2 मेगापिक्सल सेकेंडरी कॅमरा मिळतो. सेल्फीसाठी समोर 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमरा दिला आहे. याशिवाय, फोनमध्ये दिवसभर चालणारी दमदार 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
6 / 9
या Micromax Smartphone मध्ये 6.52 इंच HD+ डिस्प्ले आहे, जो 400 निट्स पीक ब्राइटनेससह येतो. याशिवाय, 89 टक्के स्क्रीन टू बॉडी रेशियो आणि 20:9 आस्पेक्ट रेशियो आहे.
7 / 9
कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट, वाय-फाय 802.11 एसी, ब्लूटूथ व्हर्जन 5, डुअल VoWiFi आणि डुअल VoLTE सपोर्ट मिळतो. याशिवाय, सिक्योरिटीसाठी फिंगरप्रिंट सेंसर आणि फेस अनलॉक सपोर्टदेखील देण्यात आला आहे.
8 / 9
या Micromax Mobile फोनच्या 4 जीबी रॅम/64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 8,999 आणि 6 जीबी रॅम/64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 9,999 आहे.
9 / 9
पण, Flipkart Big Saving Days Sale मध्ये हा फोन ग्राहकांना 8,499 रुपये आणि 9,499 रुपयांमध्ये मिळेल. म्हणजे, दोन्ही व्हेरिएंटवर कंपनीने 500 रुपयांचा डिस्काउंट दिला आहे.
टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनMicromaxमायक्रोमॅक्सtechnologyतंत्रज्ञानFlipkartफ्लिपकार्ट