Laptop Under 25000: खूप कमी किंमतीत धमाकेदार फीचर्स असलेले HP आणि Lenovo चे लॅपटॉप; विद्यार्थ्यांसाठी परफेक्ट
By सिद्धेश जाधव | Updated: January 11, 2022 18:06 IST
1 / 7विशेष म्हणजे क्रोमबुकवर Android अॅप्स देखील वापरता येतात. मायक्रोसॉफ्ट ऑफिसचा पर्याय म्हणून तुम्ही गुगल डॉक किंवा शीट्सचा वापर करू शकता. यात तुम्हाला मोठी स्क्रीन आणि कीबोर्ड वापरता येतो. 2 / 7जर तुम्ही हेवी गेमिंग किंवा व्हिडीओ एडिटिंग करण्याचा विचार करत असाल तर Chromebook ची निवड करू नये. पुढे आम्ही 25 हजारांच्या आत येणाऱ्या एचपी, लेनोवो आणि आसुसच्या क्रोमबुक्सची माहिती दिली आहे. 3 / 7HP Chromebook MediaTek MT8183 मध्ये 11.6 इंचाचा डिस्प्ले, 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज मिळते. 12 तासांचा बॅटरी बॅकअप देणारा हा लॅपटॉप 23,490 रुपयांमध्ये विकत घेता येईल. 4 / 7या लॅपटॉपमध्ये 4GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेज मिळते. 11.6 इंचाचा डिस्प्ले असलेला हा लॅपटॉप सिंगल चार्जवर 12.5 तास वापरता येतो. याची Acer Chromebook 311 C733-C5A ची किंमत 23,990 रुपये आहे. 5 / 7Asus Chromebook C223 मध्ये 11.6 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. इंटेल ड्युअल-कोर Celeron N3350 प्रोसेसरवर चालणार हा लॅपटॉप 4GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेजसह विकत घेता येईल. कंपनीनं Asus Chromebook C223 ची किंमत 23,966 रुपये ठेवली आहे. 6 / 7Lenovo Chromebook 14e मध्ये 14-इंचाचा फुलएचडी डिप्सले देण्यात आला आहे. 10 तासांचा बॅटरी बॅकअप देणारा हा लॅपटॉप 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेजसह विकत घेता येतो. लेनोवोनं यात मिलिट्री ग्रेड डिजाईनचा वापर केला आहे, त्यामुळे यातील कीबोर्ड वॉटर रेजिस्टंट आहे. Lenovo Chromebook 14e ची किंमत 24,990 रुपये आहे. 7 / 7Asus Chromebook Flip मध्ये 360-डिग्री कन्वर्टिबल टच-स्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एक मिलिट्री-ग्रेड ड्यूरेबिलिटी सर्टिफिकेशनसह येणारा क्रोमबुक आहे. प्रोसेसिंगसाठी यात इंटेल सेलेरॉन प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. 10 तासांचा बॅटरी बॅकअप देणारा हा लॅपटॉप 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. Asus Chromebook Flip ची किंमत 24,999 रुपये आहे.