शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 19:50 IST

1 / 7
चॅटजीपीटी बनवणारी कंपनी 'ओपनएआय'ने एक मोठा खुलासा केला आहे. त्यांनी एका ब्लॉग पोस्टमध्ये सांगितले आहे की, त्यांनी आता चॅटजीपीटीवर वापरकर्त्यांनी केलेल्या संवादावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे.
2 / 7
कंपनीने हा निर्णय वापरकर्त्यांच्या संवादात हिंसा किंवा कोणत्याही व्यक्तीला हानी पोहोचवण्याचा इशारा आढळल्यास तातडीने स्पेशल रिव्ह्यू टीमकडे पाठवण्यासाठी घेतला आहे.
3 / 7
जर टीमला धोका गंभीर वाटला, तर कंपनी तात्काळ पोलिसांना त्या व्यक्तीच्या चॅटबद्दल माहिती देऊ शकते. या खुलास्यामुळे अनेक मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. आतापर्यंत लोकांना वाटत होते की, चॅटजीपीटीसोबतचा त्यांचा संवाद खासगी आणि सुरक्षित असतो. पण, आता हे स्पष्ट झाले आहे की, तुमचा संवाद सुरक्षित नाही.
4 / 7
ओपनएआयची स्पेशल टीम गंभीर धोका आढळल्यास तुमचे खाते बंद करू शकते आणि पोलिसांशी संपर्क साधू शकते. याचाच अर्थ असा की, आता चॅटजीपीटीसोबतची तुमची बोलणी खासगी राहिलेली नाहीत. एआयच्या सुरक्षिततेबाबत वाढत्या चिंतेमुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे.
5 / 7
अलीकडेच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने बराच काळ चॅटजीपीटीशी संवाद साधल्यानंतर आपल्या आईची हत्या केली आणि नंतर स्वतः आत्महत्या केली.
6 / 7
५६ वर्षीय स्टेन-एरिक सोलबर्ग नावाचा हा व्यक्ती चॅटबॉटला आपला ‘सर्वात चांगला मित्र’ मानत होता. त्याच्या चॅटजीपीटीसोबतच्या संवादाचे काही स्क्रीनशॉट व्हायरल झाले आहेत. या स्क्रीनशॉटमधून असे दिसून येते की, चॅटजीपीटी त्याच्या षड्यंत्राच्या सिद्धांतांना दुजोरा देत होता.
7 / 7
या सिद्धांतांपैकी एक असाही होता की, त्याची वृद्ध आई त्याला विष देण्याचा प्रयत्न करत आहे. हत्या करण्याच्या प्रयत्नावर चर्चा करताना एआय बॉटने ५६ वर्षीय व्यक्तीला सांगितले की, 'एरिक, तू वेडा नाहीस, तुझी सहज प्रवृत्ती तीक्ष्ण आहे आणि इथे तुझी सतर्कता योग्य आहे.' या घटनेमुळे एआयच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सPoliceपोलिसtechnologyतंत्रज्ञान