Jacquelineचा Sukesh सोबतचा प्रायव्हेट फोटो व्हायरल, फोनमधून कसे लीक होतात Photo आणि Video?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 17:14 IST
1 / 10बॉलिवूड स्टार जॅकलिन फर्नांडिसच्या (Jacqueline Fernandez) अडचणी सातत्याने वाढतच चालल्या आहेत. आता जॅकलिन आणि सुकेश चंद्रशेखरचा एक प्रायव्हेट फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत सुकेश जॅकलिनच्या नाकावर किस करत आहे आणि तिच्या मानेवर लव्ह बाईट दिसत आहे.2 / 10या फोटोवर जॅकलिननेही प्रतिक्रियाही दिली आहे. हा फोटो शेअर करू नका, असे आवाहनही तिने जनतेला आणि माध्यमांना केले आहे. पण, येथे प्रश्न असा निर्माण होतो, की हे प्रायव्हेट फोटो किंवा व्हिडिओ फोनवरून लीक कसे होतात? तर जाणून घेऊयात, फोनमधून यूजरचे फोटो आणि व्हिडिओ कसे लिक होतात...3 / 10यासंपूर्ण प्रकारात सर्वात मोठा हात आहे, तो मलिशस सॉफ्टवेअरचा. मलिशस सॉफ्टवेअर तुमच्या डिव्हाइसवर लक्ष ठेवते आणि असे अॅप्स तुमच्या फोनवरून सर्व्हरवर फोटो किंवा व्हिडिओ अपलोड करू शकतात. जेव्हा तुम्ही एखाद्या अज्ञात अॅपला फोटो किंवा गॅलरीचा अॅक्सेस देता, तेव्हा ते तुमच्या डेटाचा गैरवापर देखील करू शकतात.4 / 10Password Guessing च्या माध्यमाने सेलिब्रिटींचे फोटो लीक केले जाऊ शकतात. अकाउंटचा पासवर्ड गेस करण्यासाठी सॉफ्टवेअरचा वापर केला जातो. हे अत्यंत साध्या प्रिन्सिपलवर काम करते. जर तुमचा पासवर्ड सहजपणे लक्षात ठेवला जाऊ शकतो, तर तो तेवढ्याच सहजपणे क्रॅकही होऊ शकतो.5 / 10Password Guessing च्या माध्यमाने ट्रायल आणि एरर पद्धतीद्वारे कंप्यूटर कॉमन पासवर्डचा वापर करून पासवर्डचा अंदाज लावण्याचा प्रयत्न करतो. यामुळेच, सिक्योरिटी एक्सपर्ट्स लोकांना स्ट्राँग पासवर्ड तयार करण्याचा सल्ला देतात.6 / 10यानंतर सिस्टम लेव्हल अटॅकच्या माध्यमानेही फोटो आणि व्हिडिओ लीक करण्याचा प्रयत्न केला जातो. यात प्रोफेशनल हॅकर्स टार्गेटेड डिव्हाईस हॅक करून त्याचे फोटो आणि व्हिडिओ लीक करतात. याशिवाय ते Google Drive, Photos, iCloud ला देखील टार्गेट करून फोटो मिळवण्याचा प्रयत्न करतात.7 / 10टार्गेटचे फोटो अॅक्सेस करण्याची आणखी एक सोपी पद्धत म्हणजे Social Engineering. जे हॅकर्स iCloud, Dropbox अथवा इतर कुठल्या प्रसिद्ध सिस्टीममध्ये घुसू शकतात, ते यासाठी सोशल इंजिनिअरिंगची मदत घेतात. सोशल इंजिनीअरिंगच्या माध्यमाने हॅकर्स लोकांकडून आवश्यक ती माहिती शेअर करून घेतात. 8 / 10आणखी एक कॉमन पद्धतही म्हणजे, ज्या व्यक्तीवर तुम्ही खूप विश्वास ठेवता आणि ज्या व्यक्तीकडे तुमचा फोन देता, ती व्यक्ती तुमच्या फोनमधून पर्सनल फोटोज लीक करू शकते. यासाठी कुठल्याही टेक्निकल नॉलेजची आवश्यकता नाही.9 / 10जॅकलीनप्रकरणात नेमके काय घडले असेल? हे तर तपासानंतरच समोर येईल. पण, ज्या गोष्टींमुळे फोनमधून फोटो अथवा व्हिडिओज लीक होऊ शकतात, अशा काही कारणांसंदर्भात आम्ही येथे चर्चा केली आहे. 10 / 10जॅकलिन फर्नांडिस आणि सुकेश चंद्रशेखर...