1 / 10आवड माणसाला काहीही करायला अनेकदा भाग पाडते. काहींना पुस्तक वाचायला आवडतं तर काहींनी ऑनलाईन गेम खेळायला आवडतात. प्रत्येक जण आपली आवड जपण्याचा प्रयत्न करत असतो. 2 / 10जपानमधील एका 90 वर्षांच्या आजींनी देखील हे खरं करुन दाखवलं आहे. वयाच्या 90 व्या वर्षी ऑनलाईन गेम खेळून आजींनी एक नवा विक्रम केला आहे.3 / 10हमाको मोरी असं या आजींचं नाव असून त्यांना व्हिडिओ गेमची प्रचंड आवड असल्याने 'गेमर ग्रँडमा' या नावानेही ओळखलं जातं. 4 / 10वयाच्या 39 व्या वर्षापासून त्यांनी गेम खेळायला सुरुवात केली आहे. 5 / 10हातात रिमोट कंट्रोल घेऊन गेम्स खेळण्यात आजी दिवसभर मग्न असतात. 6 / 10जगातील सर्वात वृद्ध युट्यूब गेमर असा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे.7 / 10'ग्रँड थेफ्ट ऑटो 5' हा या आजींचा सर्वात आवडता गेम आहे.8 / 102015 रोजी आजींनी एक युट्यूब चॅनल सुरू केलं. या चॅनलने जवळपास 2,50,000 सब्सक्रायबर्सचा टप्पा गाठला आहे.9 / 10एका महिन्यात त्यांनी 4 व्हिडीओ पोस्ट केले होते. गेमर आजींची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.10 / 10इतके वर्षे जगल्यानंतर मला असं वाटतंय की दीर्घ कालावधीसाठी गेम खेळण्याचा माझा निर्णय योग्य होता. मी खऱ्या अर्थाने माझ्या जीवनाचा आनंद घेतेय असं आजींनी म्हटलं आहे.