शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

5G सिमसाठी येताहेत फोन कॉल्स? काय केले पाहिजे, एक चूक पडू शकते महागात!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2022 1:52 PM

1 / 7
नवी दिल्ली : 5G लिलावानंतर, 5G सेवेची उत्सुकता तुम्हाला महागात पडू शकते. लोकांना लवकरात लवकर आपल्या 5G स्मार्टफोनला 5G नेटवर्कवर काम करताना पाहायचे आहे. अनेकजण याची वाट पाहत आहेत. पण लोकांची उत्सुकता महागात पडू शकते. कारण, स्कॅमर्स नेहमीने प्रमाणे तुमच्या घाईचा फायदा घेऊ शकतात.
2 / 7
असेच एक प्रकरण आमच्या निदर्शनास आले आहे. यामध्ये युजर्सला 5G सिम कार्डसाठी कॉल येत आहेत. आतापर्यंत कोणत्याही टेलिकॉम कंपनीने 5G सिमकार्डबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. त्यामुळे हा कॉल एखाद्या स्कॅमरचा असू शकतो.
3 / 7
युजर्सना कॉल करून त्यांचे सध्याचे कार्ड 5G सिमवर अपग्रेड करण्यास सांगितले जात आहे. हा कॉल कंपनी एक्झिक्युटिव्हच्या नावाने केला जात आहे. पण 4G च्या वेळी कंपनीने सिमकार्ड अपग्रेडसाठी कोणालाही कॉल केले नाही.
4 / 7
आतापर्यंत कोणत्याही ब्रँडने 5G सिम कार्डबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. शक्यतो हा कॉल फसवणूक करणाऱ्यांचा असू शकतो. यासंदर्भातील अनुभव आमच्यासोबत शेअर करताना एका युजर्सने सांगितले की, कॉलर सुरुवातीला कंपनी एक्झिक्युटिव्ह म्हणून त्याच्याशी बोलत होता.
5 / 7
काही संवाद झाल्यावर त्याने घराचा पत्ता जाणून घेण्यापर्यंत पोहोचला. उदाहरणार्थ, फ्रॉडस्टर्स तुमचे लोकेशन जाणून घेण्यासाठी हे करत आहेत. केवळ लोकेशनच नाही तर संभाषणातून तो तुमच्याबद्दल अनेक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतील.
6 / 7
तुम्हालाही असा कोणताही कॉल आला तर तुमचे डिटेल्स शेअर करू नका. यासंबंधीच्या माहितीसाठी तुम्ही कंपनीच्या आउटलेटवर जाऊ शकता. तेथे तुम्हाला 5G सिम कार्ड आणि त्यासंबंधित इनकमिंग कॉल्सचीही माहिती मिळेल. कंपनीच्या एक्झिक्युटिव्हकडे तुमचे बरेच डिटेल्स असतात. किमान सिमकार्ड घेताना तुम्ही दिलेली माहिती तरी असते. अशा स्थितीत तुमचे लोकेशन जाणून घेणे, हे कंपनीच्या एक्झिक्युटिव्हचे काम नाही.
7 / 7
या प्रश्नाचे थेट उत्तर नाही, असे आहे. 5G सेवा वापरण्यासाठी तुम्हाला 5G सिम कार्डची गरज नाही. जर तुमच्याकडे 4G LTE वर काम करणारे सिम कार्ड असेल तर तुम्हाला त्यावर 5G कनेक्टिव्हिटी देखील मिळेल. तुम्ही तुमच्या सध्याच्या 4G सिम कार्डवर 5G कॉल आणि डेटा देखील वापरण्यास सक्षम असाल. मात्र, नंतर तुम्हाला चांगल्या कव्हरेजसाठी 5G सिम मिळू शकते. नेटवर्क रोलआउटनंतर टेलिकॉम कंपन्या 5G सह नवीन सिम कार्ड निश्चितपणे सादर करू शकतात.
टॅग्स :Reliance Jioरिलायन्स जिओMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञानAirtelएअरटेलVodafoneव्होडाफोनIdeaआयडिया