Social Viral: चॉकलेट बॉय नाही, तर दाढी मिशीवाले पुरुष असतात प्रामाणिक; मुलींचीही त्यांनाच पसंती!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 10:46 IST
1 / 5क्लीन शेव्ह असणारे पुरुष वा बॉलिवूड हिरो यांना पूर्वी मुलींची पसंती होती. तुकतुकीत दिसण्यासाठी दाढी मिशा भादरण्याचे कष्ट मुले घेत असत. मात्र, आता तर ती फॅशन झाली आहे आणि मुलींनाही तसेच पुरुष आवडत असल्याचे सर्व्हेमध्ये लक्षात आले आहे. परंतु सुंदर दिसणे, भारदस्त दिसणे एवढेच त्या पसंतीचे कारण नाही, तर त्यामागे आहे भावनिक विचार!2 / 5'अर्काइव्हज ऑफ सेक्शुअल बिहेवियर'मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार दाढीवाले पुरुष आपल्या जोडीदाराशी प्रामाणिक असतात. त्यांना आपल्या जोडीदाराव्यतिरिक्त अन्य महिलेबद्दल आकर्षण वाटत नाही. ते आपल्या पत्नीशी, प्रेयसीशी कायम निष्ठावान असतात. ते आपल्या जोडीदाराचा विश्वास संपादन करण्यात पूर्णपणे यशस्वी होतात. 3 / 5एवढेच नाही, तर दाढीवाले पुरुष घर संसारात अधिक जबाबदारीने वागतात असेही त्या अहवालात आढळून आले आहे. त्यांनी आपले वाढते वय स्वीकारून रुपाऐवजी कर्तृत्त्वाला प्राधान्य दिल्याचे अहवालात म्हटले आहे. असे पुरुष संसारात लक्ष घालतात, घरकामात भागीदार होतात, मुलांचा नीट सांभाळ करतात आणि बायकोलाही आदराने वागवतात. 4 / 5या सर्व्हेमध्ये १८ ते ४० वयोगटातील ४१४ पुरुषांचा समावेश होता. ज्यात पुरुषांनी दाढी मिशी वाढवण्यामागे आळस हे कारण दिले असले, तरी त्यापेक्षा त्यांचे कुटुंब कार्याला आणि करिअरला असलेले प्राधान्य हा मुद्दा महत्त्वाचा असल्याचे मानस शास्त्रज्ञांच्या लक्षात आले आहे. याउलट तुकतुकीत अर्थात क्लीन शेव्ह करणाऱ्यांबाबत काढलेले अनुमान आश्चर्यचकित करणारे आहे. 5 / 5क्लीन शेव्ह असणाऱ्या मुलांना वा नटांना 'चॉकलेट बॉय' अशी उपाधी दिली जात असे, मात्र सर्व्हेनुसार असे लक्षात आले आहे की, असे पुरूष रिलेशनशिप बाबत प्रामाणिक नसतात. त्यांना एकापेक्षा अधिक व्यक्तींबद्दल आकर्षण वाटू शकते. घर संसारात ते अलिप्त असतात. त्यांचा फोकस दिसण्यावर, मिरवण्यावर आणि आकर्षून घेण्यावर जास्त असतो. अर्थात हे सर्व्हेमध्ये नोंदवलेले निरीक्षण आहे, बाकी हकीकत तुम्हीही अनुभवत असालच!