उदयपूरमध्ये शाही विवाह सोहळा, ज्युनियर ट्रम्पपासून VVIP पाहुणे येणार; कोण आहे वधू आणि वर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 13:45 IST
1 / 10उदयपूर सध्या एका भव्य दिव्य आणि हाय-प्रोफाइल लग्नासाठी चर्चेत आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील जगतात स्वत:ची ओळख बनवणारा वामसी गदिराजू आणि एका प्रतिष्ठित फार्मा उद्योग कुटुंबातून आलेली नेत्रा मंटेना यांच्या शाही लग्नासाठी जगभरातील प्रतिष्ठित पाहुणे येत आहेत. 2 / 10अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे पुत्र ज्युनियर ट्रम्प लग्नाला उपस्थित राहण्यासाठी भारतात पोहचले आहेत. गुरुवारी त्यांनी ताजमहालला भेट दिली. त्यांच्यासोबतच ४० देशांतील १२६ खास पाहुणे होते, त्यांच्याभोवती सीक्रेट सर्व्हिस आणि भारतीय सुरक्षा एजन्सींनी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली होती.3 / 10वामसी गदिराजू कोण आहेत? - वामसी गदिराजू हे Superorder नावाच्या कंपनीचे सह-संस्थापक आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी आहेत. त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून विज्ञान पदवी मिळवली. २०२४ मध्ये त्यांची आणि त्यांच्या सह-संस्थापकांची सुपरऑर्डरमधील त्यांच्या कामासाठी फोर्ब्सच्या फूड अँड ड्रिंक्स श्रेणीतील ३० अंडर ३० यादीसाठी निवड झाली. 4 / 10त्यांची कंपनी सुपरऑर्डरचं मूल्य अंदाजे १८ ते २५ मिलियन डॉलर आहे. वामसीने मल्टी-लोकेशन रेस्टॉरंट्ससाठी एआय-आधारित सॉफ्टवेअर टूल्स विकसित केले आहेत जे ऑनलाइन ऑर्डरिंग, ग्राहक अनुभव आणि डिलिव्हरी नफा सुधारण्यास मदत करतात. त्यांनी रेस्टॉरंट्ससाठी एआय वेबसाइट बिल्डरसारखी टूल्स देखील डिझाइन केली आहेत. 5 / 10नेत्रा मंटेना कोण आहेत? - नेत्रा मंटेना ही अमेरिकेतील ऑरलँडो येथे मुख्यालय असलेल्या Ingenious Pharmaceuticals अध्यक्ष आणि सीईओ राम राजू मंटेना यांची मुलगी आहे. तिची आई पद्मजा मंटेना आहे. नेत्रा एका सुप्रसिद्ध आणि प्रभावशाली व्यावसायिक कुटुंबातून येते, ज्यामुळे हे लग्न केवळ भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही चर्चेचा विषय बनले आहे.6 / 10लग्न कधी आणि कुठे होणार आहे? - वामसी आणि नेत्राचा लग्न सोहळा २१ नोव्हेंबर रोजी सुरू होणार आहे आणि पुढील चार दिवस ते चालेल. लग्नासाठी उदयपूरचे प्रतिष्ठित राजवाडे आणि ऐतिहासिक वास्तू भव्यपणे सजवण्यात आले आहेत. 7 / 10लीला द पॅलेस, मानेक चौक आणि जनाना महल सारख्या प्रसिद्ध ठिकाणी हे समारंभ आयोजित केले जातील. सर्वात मोठे आकर्षण म्हणजे पिछोला तलावाच्या मध्यभागी असलेला जग मंदिर आयलंड पॅलेस आहे, जो संपूर्ण लग्न समारंभाचे केंद्र असेल.8 / 10पाहुणे कोण असतील? या सोहळ्यात ग्लॅमर आणि राजकारणाचा संगम पाहायला मिळेल. लग्नात मोठ्या संख्येने जागतिक सेलिब्रिटी आणि हाय प्रोफाइल पाहुणे उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर आधीच भारतात आले आहेत. त्यांनी आग्रा येथील ताजमहालला भेट दिली आहे. 9 / 10आंतरराष्ट्रीय संगीत स्टार जस्टिन बीबर आणि जेनिफर लोपेझ देखील सोहळ्यात कला सादरीकरण करतील असं पुढे आले आहे. ज्यामुळे या लग्नाला ग्लॅमर स्वरुप मिळाले आहे. याव्यतिरिक्त, हॉलिवूड आणि बॉलिवूड स्टार, भारत आणि परदेशातील प्रमुख व्यावसायिक कुटुंबे आणि राजकीय व्यक्ती पाहुण्यांच्या यादीत आहेत. 10 / 10या लग्न सोहळ्याला एक विशेष अमेरिकन सुरक्षा पथक उदयपूरला आले आहे आणि त्यांनी सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली आहे, ज्यामुळे या कार्यक्रमाला अनेक VVIP परदेशी पाहुणे उपस्थित राहणार आहेत हे दिसून येते.