३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 13:40 IST
1 / 10देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसारख्या शहरात घर विकत घेणे सर्व सामान्यांच्या आवाक्याबाहेरचं आहे. मात्र घरे खरेदी करण्यासोबतच इथे भाडेवाढही मोठ्या प्रमाणात आकारली जात असल्याचं समोर आले आहे. मुंबईत नोकरीला येणाऱ्या तरूणाने त्याचा अनुभव Reddit वर शेअर केला आहे.2 / 10गोरेगावसारख्या परिसरात जुन्या इमारतीत फ्लॅटचे भाडे ४२ हजारापासून सुरू होते. जर तुमचे बजेट ३५-३८ हजार असेल तर ब्रोकर त्याकडे फारसे लक्ष देत नाही. ही पोस्ट सध्या इंटरनेटवर व्हायरल झाली आहे आणि चर्चेचा विषय बनली आहे. काहींनी त्याला मुंबई सोडण्याचा सल्ला दिला तर काहींनी भाडेदरावर चिंता व्यक्त केली आहे.3 / 10काही लोकांनी मालाड पश्चिम सारख्या जवळच्या भागात घर पाहण्याचा सल्ला दिला, तुम्हाला तिथे चांगल्या बजेटमध्ये फ्लॅट मिळू शकतो असं बोलले. तर जास्त दूर जाऊ नका अन्यथा वाहतूक आणि स्थानिक कनेक्टिव्हिटीच्या समस्या वाढतील असा इशारा दुसऱ्या युजरने दिला. 4 / 10काहींनी रेल्वे स्थानकाजवळ राहणे नेहमीच फायदेशीर असते असं म्हटलं. त्याच वेळी काही कमेंट्समध्ये तरुणाला मुंबई सोडण्याचा सल्ला देण्यात आला. दिल्ली-एनसीआर, पुणे किंवा हैदराबादसारख्या ठिकाणी नोकरी शोधा. मुंबईचा ताण आणि खर्च दोन्ही अनावश्यक आहेत असं एकाने सांगितले. 5 / 10एकेकाळी मध्यम श्रेणीचा क्षेत्र मानलं जाणारं गोरेगाव आता वेगाने विकसित झालं आहे. वेस्टिन हॉटेल, मॉर्गन स्टॅनलीचे कार्यालय यासारखे मोठे प्रकल्प येथे येत असल्याने हे ठिकाण आता एक प्रमुख भाग मानलं जाते.6 / 10मुंबईतील लोक खरोखरच कमाल आहेत. मला हे शहर नेहमीच आवडते. पण खरं सांगायचं तर इथे मागितल्या जाणाऱ्या भाड्याच्या तुलनेत शहरातील पायाभूत सुविधा अनाकलनीय आहेत. मी आधी सुमारे दोन वर्षे मुंबईत राहिलो आहे, पण यावेळी भाडे प्रचंड वाढलेले दिसते आणि सुविधा आणखी कमकुवत झाल्या आहेत असं तरुणाने म्हटलं. 7 / 10तसेच हे माझे वैयक्तिक मत आहे. मी चुकीचे असू शकते. पण इतर लोक या परिस्थितीला कसे तोंड देत आहेत? की मी एखादे चांगले क्षेत्र गमावत आहे? हे मला जाणून घ्यायचे आहे असं तरुणाने पुढे म्हटलं आहे. 8 / 10मी या महिन्यात मुंबईला शिफ्ट होत आहे आणि येथील घरांचे भाडे पाहून मला खरोखरच धक्का बसला आहे. मी गोरेगाव पश्चिम आणि जवळच्या भागात चांगल्या 1BHK च्या घराच्या शोधात आहे... नवीन इमारत नाही, फक्त राहण्यायोग्य आणि खूप जुनी नाही. पण भाड्याचे दर गगनाला भिडणारे आहेत असं त्या तरुणाने पोस्टमध्ये लिहिले आहे. 9 / 10जुन्या मालमत्ता देखील ४२ हजार रुपयांपासून सुरू होत आहेत. जेव्हा मी एका ब्रोकरला ३५-३८ हजार रुपयांच्या बजेटमध्ये चांगल्या 1BHK बद्दल विचारले तेव्हा तो माझ्याकडे बघून हसला असंही तरुणाने सांगितले. 10 / 10अलीकडेच महाराष्ट्राच्या शहरी भागात राहणाऱ्या श्रीमंत कुटुंबांना मुंबईत घर घेण्यासाठी १०९ वर्षांचा कालावधी लागणार आहे. म्हणजेच मुंबईत घर खरेदी करण्यासाठी सध्याच्या घडीला महिना ८९ हजारांपेक्षा जास्त कमावणाऱ्यांना ५ टक्के श्रीमंतांना १०९ वर्षे पैसे वाचवावे लागतील असा सर्व्हे रिपोर्ट आला होता.