फोटोग्राफरने लोकांच्या हातातून गायब केले स्मार्टफोन, मग काय झालं ते बघा....
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 16:07 IST
1 / 9स्मार्टफोनमुळे कामे सोपी झाली असली तरी लोकं स्मार्टफोनच्या जाळ्यात इतके अडकले आहेत की, त्यांनी आजूबाजूचं काहीच दिसत नाही. स्मार्टफोनमुळे लोकांच्या जीवनातील खरेखुरे मित्र गायब झालेत आणि स्मार्टफोनच लोकांचा मित्र झाला. लोकांची सकाळही याने आणि रात्रही यानेच होते. एका फोटोग्राफरचे हे फोटो पाहून लोक स्मार्टफोनमध्ये कसे गुंतले आहेत हे दिसून येतं. फक्त या फोटोंमध्ये लोकांच्या हातातील स्मार्टफोन गायब केले आहेत. त्यानंतर सगळेच एकटे झाले आहेत.2 / 9सोबत असूनही का रे असा दुरावा....3 / 9आई माझ्याशी बोलकी....4 / 9कभी उनके हाथ मेरी जुल्फो में हुआ करते थे....5 / 9अरे यांना कुणीतरी जुनी स्टॉकमधील खेळणी द्या रे.....6 / 9ते म्हणायचे ना बायकांच्या पोटात कोणतीही गोष्ट पचत नाही. आता सगळंच पचतं.7 / 9इथे फक्त खुर्च्याच आहेत.8 / 9जय-वीरू ची गोष्ट आता जुनी झाली.9 / 9अमेरिकेतील फोटोग्राफर एरिक पिकर्सगिल असं या फोटोग्राफरचं नाव आहे. त्याने Removed नावाची एक सीरिज चालवली. या फोटोंच्या माध्यमातून स्मार्टफोनमुळे आपलं जगणं कसं झालंय हे दाखवतात.