शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

'पीछे तो देखो' व्हिडीओमुळे पाकिस्तानचा 'हा' मुलगा एका रात्रीत बनला स्टार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 13:25 IST

1 / 5
मागील काही महिन्यांपासून एक पठाणी मुलगा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. गुबगुबीत असणाऱ्या या मुलाच्या व्हिडीओला लाखो जणांनी लाईक्स केलं आहे. या मुलाचं नाव आहे अहमद शाह..हा मुलगा पाकिस्तानमध्ये राहणारा आहे.
2 / 5
संपूर्ण जगाला वेड लावलेलं वाक्य 'पीछे तो देखो' यामुळे प्रसिद्ध झालेल्या या मुलाला अनेक जाहिरातीदेखील मिळू लागल्या आहेत. त्याच्या क्युटनेसचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने अनेक जाहिरात कंपन्यांनी त्यांच्याकडे रांगा लावल्या आहेत.
3 / 5
अलीकडेच या मुलाने तेलाच्या बाटलीची जाहिरात केली. त्याचसोबत फ्रूट ड्रिंकची जाहिरातही त्याला मिळाली आहे. अहमदचा हा अंदाज फक्त पाकिस्तानात नव्हे तर भारतातही मोठ्या प्रमाणात पसंत पडत आहे.
4 / 5
अहमद हा 4 वर्षाचा आहे. अहमदचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तो फेमस झाला. त्यामुळे पाकिस्तानमधील टीव्ही शो गुड मॉर्निंग पाकिस्तान यामध्येही तो झळकला होता.
5 / 5
मागील महिन्यात अहमद याचा अंदाज बघून त्याला एका दूध कंपनीचं ब्रँड एबेंसिडर बनविलं गेलं. ही कंपनी गायच्या दुधाच्या विक्री करते. अहमद इतका प्रसिद्ध झाला आहे की त्याच्यासाठी अनेक कंपन्या लाखो-करोडो रुपये खर्च करण्यात तयार आहेत.
टॅग्स :Social Mediaसोशल मीडिया