शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'निळ्या रंगाच्या ड्रम'वर सोशल मीडियात Reels व्हायरल; काय आहे यामागचं भयानक कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 18:32 IST

1 / 10
आजकालच्या काळात सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. याठिकाणी रातोरात ट्रेंड बनतात. त्यातून बऱ्याच गोष्टी व्हायरल होतात. आजूबाजूच्या घडणाऱ्या घडामोडीही चर्चेत येतात. सध्या तुम्ही सोशल मीडियात निळ्या रंगाचा ड्रमवरून बरेच रिल्स पाहिले असतील.
2 / 10
निळ्या रंगाचा ड्रम हा बहुतेक सर्वच घरात पाण्याच्या अतिरिक्त साठ्यासाठी वापरला जातो. परंतु याच ड्रमचा केलेल्या गुन्हा लपवण्यासाठी वापर होतो हे अलीकडेच एका प्रकरणातून समोर आले आहे. नीळ्या रंगाचा ड्रम सोशल मीडियात का व्हायरल होतोय याचं कारणही तुम्हाला या घटनेतूनच कळेल.
3 / 10
उत्तर प्रदेशातील मेरठ इथल्या सौरभ राजपूत हत्याकांडाने देशभरात खळबळ माजली आहे. सौरभची पत्नी मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिलनं ज्या प्रकारे ही हत्या घडवून आणली ते पाहून प्रत्येकजण हैराण झाला आहे. मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिलने सौरभची हत्या करण्याचं प्लॅनिंग खूप आधीच केले होते.
4 / 10
मुस्कान आणि साहिल या दोघांनी नियोजितपणे सौरभची हत्या केली. त्यानंतर आता तपासात मुस्कानने मोठा खुलासा केला आहे. मुस्कान आणि साहिलने ज्या ड्रममध्ये सौरभच्या मृतदेहाचे तुकडे ठेवले आणि त्यात सिमेंट टाकले होते. त्या ड्रममध्ये झाड लावण्याचं प्लॅनिंग मुस्कानने केले होते.
5 / 10
सौरभची हत्या करून त्याचा मृतदेह ड्रममध्ये टाकायचा. त्यात माती टाकून तिथे झाड लावायचे असं मुस्कानचं प्लॅनिंग होते. मात्र ड्रममधून मृतदेहाचा वास बाहेर येईल त्यामुळे मुस्कान आणि तिच्या प्रियकराने मिळून या ड्रममध्ये सिमेंट भरून त्यात मृतदेहाचे तुकडे गाडले होते. काहीही करून मुस्कानला साहिल हवा होता. त्यामुळे तिने पती सौरभला संपवायचं हे निश्चित केले.
6 / 10
त्यामुळे सौरभची हत्या करून त्याच्या मृतदेहाचे १५ तुकडे केले होते. त्यानंतर ड्रममध्ये सिमेंट भरून त्याचा मृतदेह लपवून आला. सौरभ आणि मुस्कान यांना ६ वर्षाची मुलगी होती. मुलीसमोरच साहिल आणि मुस्कान एकमेकांच्या जवळ यायचे. सौरभची हत्या करून साहिलसोबत मुस्कान हिमाचल प्रदेशला फिरायला गेली होती.
7 / 10
सौरभच्या हत्येसाठी मुस्काननं ८०० रूपयांचे २ चाकू खरेदी केले होते. त्यानंतर ८ दिवस साहिल, मुस्कान यांनी हत्येची तयारी केली. चाकूने नीट हल्ला करता येत नाही म्हणून मुस्कानने एक वस्ताराही खरेदी केला. सौरभच्या छातीवर चाकू हल्ला केल्यानंतर मुस्कानने वस्तऱ्याने त्याचा गळा चिरला. त्यानंतर साहिलने सौरभचे शीर आणि धड वेगळे केले.
8 / 10
मुस्कान आणि साहिल यांच्या नात्याबाबत पती सौरभला माहिती पडलं होते. त्यात लंडनचा व्हिसा संपल्याने तो पुन्हा व्हिसा बनवण्यासाठी इथं आला होता. यावेळी तो आपल्या मुलीला सोबत घेऊन जाणार होता. त्यासाठी मुलीचाही पासपोर्ट सौरभने काढला. सौरभ मुस्कानलाही लंडनला घेऊन जाणार होता मात्र तिने त्यास नकार दिला.
9 / 10
सौरभ दर महिन्याला १० हजार खर्चासाठी मुस्कानला द्यायचा. त्यामुळे मुस्कान नाराज होती कारण तिला १० हजारात घर चालवायला लागायचे. परंतु नशेसाठी तिच्याकडे पैसे शिल्लक राहायचे नाही. मुस्कान आणि साहिल दररोज २ बॉटेल दारू प्यायचे. मुस्कान आणि साहिलने हत्येसाठी ड्रम, चाकू, सिमेंट, ब्लिचिंग पावडर सर्वकाही ऑनलाईन खरेदी केले होते.
10 / 10
सौरभ हत्याकांडामुळे निळ्या रंगाचा ड्रम सोशल मीडियात चर्चेत आला आहे. या हत्याकांडाचा परिणाम बाजारावरही झाला आहे. निळ्या रंगाच्या ड्रमची विक्री कमी झाली आहे. मागील ४ दिवसांपासून मेरठ येथे ड्रमच्या विक्रीत घट झाली आहे. कारण ड्रम खरेदी करणाऱ्यांना पोलीस चौकशीला सामोरे जावं लागत आहे.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी