By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 13:16 IST
1 / 10लडाखच्या गलवान खोऱ्यात वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) भारत-चीन सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीनंतर तणाव वाढला आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर तैवानमध्ये सोशल मिडियावर एक फोटो व्हायरल होताना दिसत आहे. 2 / 10या फोटोमध्ये भगवान रामाने चिनी ड्रॅगनवर निशाणा साधल्याचे दाखविण्यात आले आहे. तसेच, या फोटोवर ‘वी काँकर, वी कील’ म्हणजेच आम्ही विजय मिळवू आणि ठार करु (शत्रूला) असे लिहिण्यात आले आहे. 3 / 10तैवान न्यूज नावाच्या एका ट्विटर अकाउंटवरुन हा फोटो शेअर करण्यात आला असून त्याला ‘फोटो ऑफ द डे’ अशीही कॅप्शन देण्यात आली आहे. भारताच्या रामाने चीनच्या ड्रॅगनवर हल्ला केला, असे तैवान न्यूजने लिहिले आहे.4 / 10तैवानमध्ये हे पोस्टर व्हायरल झाल्यानंतर भारतामध्येही सोशल मिडियावर व्हायरल झाल्याचे दिसत आहे. या पोस्टवर भगवान रामाने चिनी ड्रॅगनवर धनुष्यबाण रोखल्याचे दिसत आहे. 5 / 10भारतामध्ये दसऱ्याला अशाप्रकारचे फोटो व्हायरल होताना दिसतात. यामध्ये भगवान राम रावणाचा वध करताना दाखवण्यात येते. भारतामध्ये वाईटाने चांगल्यावर विजय मिळवल्याचा आनंदोत्सव म्हणून दसरा साजरा केला जातो. 6 / 10तैवानमध्ये चीनविरोधात प्रचंड राग आहे. तैवानविरोधातही चीनने अनेकदा कुरापती केल्या आहेत. मात्र, तैवान चीनच्या दबाला जास्त महत्व देत नाही.7 / 10चीन आपल्या आजूबाजूच्या लहान मोठ्या देशांच्या भूभागांवर आपला अधिकार असल्याचे दाखवतो आणि तो बळकावण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे तैवान सुद्धा चीनला विरोध करतो. 8 / 10दरम्यान, भारत आणि चीनमध्ये सोमवारी झालेल्या हिंसक धुमश्चक्रीमध्ये चीनचे 43 हून सैनिक मारले गेले आहेत. तर भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत.9 / 10चीनच्या सैनिकांनी भारताच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो त्यांच्याच अंगलट आला आहे.10 / 10या घटनेनंतर सीमेवरील तणाव वाढला असून चीनविरोधात संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे आता लडाख सीमेजवळच नाही तर संपूर्ण सीमेवर जवान सतर्क आहेत.