शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सर्वात जास्त सुंदर कोण इवांका की ताजमहाल?; सोशल मीडियावर व्हायरल होतोय 'हा' भन्नाट फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 14:55 IST

1 / 12
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दोन दिवसांच्या भारताच्या दौऱ्यावर आले होते. अमेरिका आणि भारत यांच्यात होणाऱ्या सुरक्षा करारासाठी त्यांचा हा दौरा होता.
2 / 12
या दौऱ्यानिमित्त डोनाल्ड ट्रम्प सहकुटुंब भारतात आले होते, यावेळी त्यांच्यासोबत पत्नी मेलेनिया, मुलगी इवांका आणि जावईदेखील सोबतीला होते.
3 / 12
यावेळी ट्रम्प कुटुंबाने आग्रा येथील ताजमहाल येथे भेट दिली. यावेळी इवांका ताजमहालच्या प्रेमात पडली. पतीन जेरेडसोबत इवांकाने मनसोक्त फोटो काढले
4 / 12
सध्या इवांकाचे फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. इवांका हिच्या फिटनेसपासून तिने घातलेल्या ड्रेसचीही चर्चा होत आहे. ताजमहाल भेटीवेळी इवांकाने गाईडला अनेक प्रश्न विचारले, त्यानंतर ताजमहालला पुन्हा येण्याची इच्छाही व्यक्त केली.
5 / 12
सोशल मीडियावर एका युजर्सने इवांकाचा फोटो फेसबुकवर पोस्ट केला. त्या फोटोत त्याने लिहिलं की कोण सर्वात जास्त सुंदर आहे इवांका की ताजमहाल? या फोटोला ९ तासातंच २१ हजार जणांनी लाईक्स केलं तर १५५ लोकांनी शेअर केले.
6 / 12
ताजमहालच्या डायना बेंचवर बसून इवांका ट्रम्पने फोटो काढला. तो फोटो अतिशय सुंदर आला आहे. या फोटोबाबत लोकांनी कमेंट आणि शेअर केलेत. अनेकांनी इवाकांच्या सौदर्याचे कौतुक केले आहे.
7 / 12
प्रोटोकॉलनुसार इवांका ताजमधल्या मुख्य घुमटात जाऊ शकत नाही, त्यामुळे मध्यभागी असलेल्या डायना बेंचच्या पुढे ती गेली नाही. मुख्य घुमटाबाबत तीने गाईडकडून माहिती जाणून घेतली.
8 / 12
इवांका ट्रम्पने ताजमहाल पाहिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले, भारताकडून झालेला पाहुणचार मनाला भावला असल्याने पुन्हा ताजमहाल पाहण्यासाठी येऊ असं तिने सांगितले.
9 / 12
पती जेरेडसोबत इवांका मोठ्या आनंदात ताजमहाल पाहण्यात गुंग झाली होती. अनेक सेल्फी, फोटो काढले, इतकचं नव्हे तर सोशल मीडियावरही तिने व्हिडिओ शेअर केला.
10 / 12
आग्रा येथील गाईड कमल कांता गुप्ता यांनी इवांकाला ताजमहालबद्दल माहिती दिली. मुमताजची कहाणी जाणून घेण्याची उत्सुकताही इवांकाला लागली होती.
11 / 12
डोनाल्ड ट्रम्प आणि पत्नी मेलेनियानेही ताजमहाल येथे फोटो काढले. ट्रम्प येणार असल्याने ताजमहाल येथे पर्यटकांना बंदी केली होती. यावेळी ट्रम्प यांनी ताजमहालबद्दल माहिती जाणून घेतली.
12 / 12
ताजमहालला भेट दिल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पर्यटकांच्या अभिप्रायमध्ये लिहिलं की, ताजमहाल भारतीय संस्कृती आणि विविधतेत सुंदरता त्याची प्रचिती आम्हाला प्रेरित करते असं म्हटलं.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पTaj MahalताजमहालSocial Mediaसोशल मीडिया