शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Donald Trump Visit: 'या' कारणासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'द बीस्ट' कारमध्ये बसले नाहीत पंतप्रधान मोदी?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 3:35 PM

1 / 10
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर आहे. ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यानिमित्त मोठी जय्यत तयारी केली आहे. मात्र आम्ही तुम्हाला एक अशी बातमी सांगणार आहोत जे ऐकून तुम्हाला धक्का बसेल
2 / 10
ही घटना तेव्हाची आहे ज्यावेळी पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यात गाडी बसले होते.
3 / 10
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची कार सर्वात सुरक्षित कार मानली जाते. फक्त राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी या कारची निर्मिती करण्यात आली आहे. ही कार बाजारात कुठेही विक्रीसाठी उपलब्ध नाही. कोणाची इच्छा असली तरी अशी कार खरेदी करु शकत नाही.
4 / 10
डोनाल्ड ट्रम्प एअरपोर्टला उतरल्यानंतर त्यांची पत्नी मेलेनिया ट्रम्प यांच्यासोबत Cadilac one कारमध्ये बसले. त्याच कारणामुळे कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांच्यासोबत प्रवास करण्याऐवजी स्वत:च्या कारमधून प्रवास केला असेल अशी चर्चा आहे.
5 / 10
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष देशाबाहेर दौरा करतात त्यावेळी या कारमधून प्रवास करतात. कारचे गेट 8 इंच जाड असून त्याची विंडो बुलेट प्रूफ आहे. कारची फक्त एक विंडो उघडते जी ड्रायव्हर सीटच्या बाजूला आहे. ड्रायव्हरची केबिन आणि ट्रम्प यांच्या केबिनमध्ये काचेची भिंतदेखील आहे जेणेकरुन ट्रम्प यांची गुप्त बैठक आणि चर्चा गुप्त असू शकेल. ट्रम्प यांच्याकडे एक उपग्रह फोन असतो ज्याच्या मदतीने ते कोणत्याही वेळी कोणाशीही बोलू शकतात. गाडीच्या डिग्गीमध्ये ट्रम्पच्या रक्त प्रकाराचे रक्तही ठेवले जाते.
6 / 10
ट्रम्प यांच्या भेटीपूर्वी त्यांची कार 'द बीस्ट' अमेरिकन एअर फोर्स सी -१७ ग्लोबमास्टर ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टमधून भारतात आली आहे. या कारची निर्मिती अमेरिकन कंपनी जनरल मोटर्सने केली आहे. ट्रम्पची कार जगातील सर्वात सुरक्षित कार मानली जाते. अणू हल्ला आणि रासायनिक हल्ल्यामुळेही याचा परिणाम होत नाही.
7 / 10
काही वर्षापूर्वी तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारतात आले होते त्यावेळी Cadilac One कारशिवाय अन्य कोणत्याही वाहनात बसत नाहीत. बराक ओबामा यांच्या सुरक्षा एजेंसीने त्यांनी दुसऱ्या कारमध्ये बसण्याची परवानगी दिली नाही.
8 / 10
सुरक्षेच्या कारणास्तव बराक ओबामा Cadilac One कार मध्ये बसण्यास सांगण्यात आले त्यावेळी नरेंद्र मोदी ओबामा यांच्यासोबत त्यांच्या कारमध्ये बसले.
9 / 10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात मैत्री आहे. मात्र या दौऱ्यात मोदी आणि ट्रम्प यांनी वेगवेगळ्या गाडीत प्रवास केला. जवळपास २२ किमी रोड शोमध्ये मोदी आणि ट्रम्प वेगवेगळ्या गाडीत बसले. पंतप्रधान त्यांच्या रेंज रोवर एसयूवी तर ट्रम्प द बीस्टमध्ये बसले.
10 / 10
कारमध्ये मशीन गन, टायर्ड गॅस सिस्टम, फायर फाइटिंग आणि नाईट व्हिजन कॅमेरे अशी उपकरणे आहेत. गरज भासल्यास शत्रूवरही या कारने हल्ला केला जाऊ शकतो. कारची टायर रिम मजबूत स्टीलची बनलेली आहे. याचा अर्थ असा की टायर पंक्चर झाला तरी कारच्या गतीवर परिणाम होणार नाही. या गाडीत जे पेट्रोल टाकण्यात आले आहे, त्यात खास फोम मिसळले आहे, जेणेकरून कोणताही स्फोट होणार नाही.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पNarendra Modiनरेंद्र मोदीAmericaअमेरिका