शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 17:02 IST

1 / 7
बाबा वेंगा या आपल्या भाकितांसाठी संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यांची अनेक भाकितं आजवर खरी ठरली आहेत. उदाहरणादाखलच सांगाचे झाल्यास, चेरनोबिल अणु संकट. त्यांचे अधिकांश जीवन बल्गेरिया येथेच गेले. त्यांना 'बाल्कनचा नॅस्ट्रोडॅमस' म्हणूनही ओळखले जाते.
2 / 7
कोविड महामारी असो किंवा नैसर्गिक आपत्ती असो, त्यांची अनेक भाकिते अचूक ठरली आहेत. बाबा वेंगांची आणखी एक भविष्यवाणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
3 / 7
बाबा वेंगा यांनी २०२५ मध्ये होणाऱ्या युद्धाबद्दलही भाकीत केले होते. २०२५ मध्ये असे काहीतरी घडेल ज्यामुळे दोन देशांमध्ये विनाशकारी युद्ध होईल. या लढाईमुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेचे नुकसान होईल, असं भाकित त्यांनी केले होते. त्यांच्या या भाकिताला भारत-पाकिस्तान तणावाशी जोडले जात आहे.
4 / 7
पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध बरेच बिघडले आहेत. भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक मोठी पावले उचलली आहेत जी त्यांच्यासाठी चिंतेचा विषय बनली. आता युद्धविरामवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.
5 / 7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. युदजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. ६ वर्षांपूर्वी एका अभ्यासात भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आला होता.
6 / 7
भारत-पाकिस्तान युद्ध संपल्याच्या बातम्या येत असल्या तरी, पाकिस्तान आपल्या नापाक कारवाया थांबवत नाही. नेहमीप्रमाणे, पाकिस्तानकडून विधान करुन धमक्या देत आहेत. काहींनी अणू बॉम्ब टाकण्याची धमकी दिली.
7 / 7
एका संशोधनानुसार, अणुयुद्ध झाल्यास कोट्यवधींचा मृत्यू होऊ शकतो. या युद्धामुळे जगभरात मोठ्या प्रमाणात उपासमार होईल.