सोशल मीडियावर दबदबा! वर्षाला ३०० कोटींहून अधिकची कमाई; २८ वर्षीय मॉडेलची सर्वत्र चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2024 20:10 IST
1 / 10आजच्या सोशल मीडियाच्या जगात अनेकजण असे आहेत, जे सोशल मीडियाला आपल्या उत्पन्नाचा स्त्रोत बनवून उदरनिर्वाह करतात. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवून कोट्यवधी कमावणाऱ्यांची संख्या खूप आहे. 2 / 10आज आपण अशाच एका मॉडेलबद्दल जाणून घेणार आहोत, जी वर्षाला ३०० कोटींहून अधिकची कमाई करते. 3 / 10फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्राम हे असे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत, जिथे युजर्स त्यांचे व्हिडीओ आणि फोटो अपलोड करून फॉलोअर्संना आकर्षित करतात. खरं तर सोशल मीडिया हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून कमाईचे देखील साधन बनले आहे.4 / 10कोरिना कोफ (Corinna Kopf) नावाची ही मॉडेल हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून कोट्यवधींची कमाई केली. सुरुवातीला फक्त YouTube ब्लॉगरच्या ब्लॉगवर ती दिसली होती.5 / 10पण आता ती तिचे फोटो आणि व्हिडीओ इतर अनेक प्लॅटफॉर्मवर अपलोड करते. तिचे फॉलोअर्स लाखोच्या घरात असल्याने तिला यातून पैसेही मिळतात.6 / 10सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर ही मॉडेल तिच्या अकाउंटच्या सबस्क्रिप्शनद्वारे दरमहा ३५ कोटी रुपये कमावते. तसेच तिचे वार्षिक उत्पन्न ३०० कोटी रुपयांच्या घरात आहे.7 / 10अमेरिकन मॉडेल कोरिना कोफ तिचे व्हिडीओ आणि फोटो इंस्टाग्रामसह विविध प्लॅटफॉर्मवर शेअर करते. 8 / 10कोरिनाकडे महागड्या गाड्यांचा खजिना आहे. ज्यांच्यासोबत ती अनेकदा फोटो क्लिक करते आणि सोशल मीडियावर अपलोड करते.9 / 10तिने पहिल्यांदा एक सुपर ग्लॅमरस फोटो अपलोड केला तेव्हा त्या फोटोतून तिने १ कोटी ३७ लाख रुपये कमावले होते, असा दावा तिने केला होता.10 / 10तिने पहिल्यांदा एक सुपर ग्लॅमरस फोटो अपलोड केला तेव्हा त्या फोटोतून तिने १ कोटी ३७ लाख रुपये कमावले होते, असा दावा तिने केला होता.