शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

"सरकारी नोकरी नाही, पण ११ वर्षांचे प्रेम आहे"; रंगावरुन ट्रोल करणाऱ्यांना नवरदेवाने दिलं चोख प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 17:59 IST

1 / 9
ऋषभ राजपूत आणि सोनाली चौकसे यांच्या लग्नाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच, काही युजर्सनी नवरदेवाच्या रंगावरून अत्यंत अश्लील आणि अपमानजनक कमेंट्स करत त्यांना ट्रोल केले.
2 / 9
नवरदेवाचा रंग सावळसर असल्याने, सोनाली चौकसेने 'पैसा किंवा सरकारी नोकरी' पाहून लग्न केले असा थेट आरोप सोशल मीडिया युजर्सकडून केला. मात्र, या सर्व ट्रोलिंगला ऋषभ राजपूतने अत्यंत दमदार आणि भावनिक उत्तर दिले असून, त्यांच्या ११ वर्षांच्या प्रेमाची कहाणी आता चर्चेचा विषय ठरली आहे.
3 / 9
मध्य प्रदेशातील या जोडप्याने ११ वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर नुकतेच लग्न केले. त्यांच्या आनंदी क्षणांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच, ट्रोलिंगला सुरुवात झाली. अनेक युजर्सनी सोनालीला थेट विचारले की, तिने 'सरकारी नोकरी किंवा बँक बॅलन्स' पाहून ऋषभसोबत लग्न केले आहे का.
4 / 9
'अशी काय मजबूरी होती दीदी?' किंवा 'या प्रकारच्या लग्नामागे खरे कारण काय असते?' असे प्रश्न अनेक युजरने फोटो शेअर करून विचारले, ज्यामुळे हे जोडपे मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.
5 / 9
अनेकांनी तर रंगासोबत जात आणि पैशाचाही संबंध जोडून अत्यंत द्वेषपूर्ण कमेंट्स केल्या. या ट्रोलिंगनंतर नवरदेव ऋषभ राजपूत स्वतः समोर आला आणि त्याने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले.
6 / 9
ऋषभने स्पष्ट केले की, माझ्याकडे कोणतीही सरकारी नोकरी नाही. मी माझ्या कुटुंबासाठी काम करतो आणि त्यांना चांगले जीवन देऊ इच्छितो. ऋषभने सांगितले की, मी कॉलेजमध्ये होतो आणि माझ्याकडे काहीच नव्हते, तेव्हापासून सोनाली माझ्यावर प्रेम करते. आम्ही गेल्या ११ वर्षांपासून म्हणजे आयुष्याच्या एक-तृतीयांश भागापासून एकमेकांवर प्रेम करत आहोत.
7 / 9
मी माझ्या बायकोवर प्रेम करतो आणि चांगला पती म्हणून तिची काळजी घेईन. माझ्या उत्पन्नाची चिंता करण्याची गरज नाही,' असेही त्याने स्पष्ट केले. सोनालीला वधूच्या रूपात पाहून त्याला अश्रू आवरणे कठीण झाले होते.
8 / 9
ऋषभने ट्रोलर्सला एक सल्लाही दिला. 'मी आशा करतो की तुम्हालाही कोणीतरी असे भेटेल, जो तुमच्यावर ती (सोनाली) माझ्यावर करते तितकेच प्रेम करेल, पण आता असे प्रेम मिळणे खूप कठीण आहे.'
9 / 9
या जोडप्याला ओळखणाऱ्या काही युजर्सनी सोशल मीडियावर त्यांच्या बाजूने पोस्ट करत, त्यांचे ११ वर्षांचे नाते किती मजबूत आहे हे स्पष्ट केले आहे. 'प्रेमाच्या रंगाला कोणतीही सीमा नसते,' हेच या जोडप्याने आपल्या कृतीने सिद्ध केले आहे.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलInstagramइन्स्टाग्राम