शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लैंगिक जीवन : ऐनवेळेला महिलांच्या 'या' चुकांमुळे होतो मूड ऑफ, नंतर पार्टनरलाच देतात मग दोष!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 4:11 PM

1 / 8
प्रत्येक महिलेला असं वाटत असतं की, त्यांचा संसार रोमांचक आणि आनंदाचा रहावा. पण यासाठी सगळी मेहनत पतीने करावी. काही महिलांना असं वाटत असतं की, प्रत्येक गोष्टीत त्यांच्या पतीने पुढाकार घ्यावा. या नादात त्यांचं लैंगिक जीवनही प्रभावित होतं. त्यांच्या इच्छा यामुळे पूर्ण होत नाहीत. अशाच काही चुका महिला शारीरिक संबंधावेळी करतात. चला जाणून घेऊ काय आहेत या चुका....
2 / 8
१) त्यानेच पुढाकार घ्यावा... अनेकदा महिला हाच विचार करून पुढाकार घेत नाहीत की, हे तर पार्टनरचं काम आहे. त्या असा विचार करतात की, त्यांना शारीरिक संबंधावेळी काय हवंय याचा विचार त्यांच्या पार्टनरनेच करावा.
3 / 8
त्यामुळे त्या त्यांच्या मनातील काही सांगत नाहीत. हा विचार फारच चुकीचा आहे. जोपर्यंत तुम्ही तुम्हाला काय हवंय हे सांगणार नाहीत, तोपर्यंत त्यांना कसं कळणार. मोकळेपणाने त्यांना तुमच्या इच्छांबाबत सांगा.
4 / 8
२) त्याला तुमच्या मनातलं कळत नाही. - अनेकदा पुरूष घाईत करतात, पण महिला पार्टनरची इच्छा काही वेगळीच असते. पुरूष फोरप्लेसाठी जास्त वेळ देत नाहीत. तर महिलांना फोरप्ले जास्त पसंत असतो.
5 / 8
जर तुमच्या पार्टनरला हे माहीत नसेल तर त्यांना सांगा की, थेट इंटरकोर्सआधी फोरप्ले किती आनंददायी असतो. फोरप्ले दरम्यान काही नवीन करू शकता. त्यांना सांगा की, तुम्हाला हे असंच करायचं आहे. एकदा जर त्यांनी तुमची गरज समजून घेतली तर ते नक्कीच पूर्ण करतील.
6 / 8
३) शरीराबाबत हीनभावना - महिला ही बाब मान्य करत नाहीत, पण हे खरं आहे. अनेक महिला स्वत:च्या शरीराबाबत हीनभावनेने ग्रस्त असतात. त्यांना असं वाटत असतं की, शारीरिक संबंधावेळी पार्टनरनेस अमूक अंग बघू नये, यावरून त्या चिडतात सुद्धा. जर तुम्हीही असाच विचार करत असाल तर हे योग्य नाही. तुमचं शरीर परफेक्ट असेल तर त्यांना मोकळेपणाने तुम्हाला काय वाटतं ते सांगा.
7 / 8
४) संबंधासाठी नेहमी नाही म्हणणं...शारीरिक संबंधाबाबत हे आपल्याकडे आधीपासून होत आलं आहे. पुरूष हो हो करत जातील आणि महिला नाही नाही. पण शारीरिक संबंधाबाबत नेहमी असं करणं योग्य नाही. हे उलटही असायला हवं. शारीरिक संबंधासाठी पुढाकार तुमच्याकडूनही असायला पाहिजे.
8 / 8
५) शारीरिक संबंधानंतर पार्टनरसोबत वागणं.... अनेकदा महिला शारीरिक संबंधानंतर पार्टनरसोबत लाडात असे काही शब्द बोलून जातात ज्याने पार्टनर नाराज होऊ शकतो. याने पार्टनरचा मूड खराब होऊ शकतो. त्यामुळे असं अजिबात करू नका. शारीरिक संबंध हा जीवनाचा महत्वाचा भाग आहे. त्यातून मिळणारा आनंद आरोग्यासाठीही महत्वाचा आहे.
टॅग्स :Sex Lifeलैंगिक जीवनRelationship Tipsरिलेशनशिप